महाराष्ट्र

maharashtra

शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० : मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

By

Published : Nov 30, 2020, 7:03 PM IST

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून ठिकठिकाणच्या केंद्रांसाठी पथके रवाना झाली आहेत. सर्व पथकांनी आपापली जबाबदारी नीट समजून घेऊन, निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी दिले आहेत.

teacher constituency elections in amravati
शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० : मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

अमरावती - शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून ठिकठिकाणच्या केंद्रांसाठी पथके रवाना झाली आहेत. सर्व पथकांनी आपापली जबाबदारी नीट समजून घेऊन, निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी दिले आहेत.

शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० : मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज
27 उमेदवार; 35 हजार 622 मतदारशिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 35 हजार 622 असून, त्यात 26 हजार 60 पुरुष आणि 9 हजार 562 महिलांचा समावेश आहे.निवडणूक साहित्याचे वितरणमतदानासाठी जिल्ह्यातील नियुक्त पथकांना निवडणूक साहित्याचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बॅडमिंटन हॉलमधून करण्यात आले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते.याठिकाणी होणार मतदान

धारणी- तहसील कार्यालय, चिखलदरा- तहसील कार्यालय, दर्यापूर-तहसील कार्यालय, अंजनगाव सुर्जी- तहसील कार्यालय, अचलपूर- तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय, चांदूर बाजार- तहसील कार्यालय, भातकूली- उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय, अमरावती (ग्रामीण)- गणेशदास राठी हायस्कूल कक्ष क्रमांक 4, अमरावती (शहर)- जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 2, जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 3, जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 4, जि.प. मुलींची शाळा (कॅम्प) येथील कक्ष क्रमांक 2, 3 व 4, गोल्डन किड्स इंग्लिश स्कूल कक्ष क्रमांक 6, 7 व 8, मोर्शी- तहसील कार्यालय, वरुड- तहसील कार्यालय (2), तिवसा- तहसील कार्यालय, नांदगाव खंडेश्वर- तहसील कार्यालय, चांदूर रेल्वे- तहसील कार्यालय, धामणगाव रेल्वे- तहसील कार्यालय.

मतदान साहित्य होणार अमरावतीच्या शासकीय गोदामात जमा

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक साहित्याचे संकलनही विकेंद्रीकृत पद्धतीने होणार आहे. मतदान केंद्रावरील साहित्य सर्वप्रथम जिल्हास्तरावरील सुरक्षा कक्षामध्ये जमा केले जाईल. यानंतर ते विलासनगर येथील शासकीय धान्य गोदामात ठेवण्यात येईल. त्यानुसार सर्व सुरक्षित उपायांची अंमलबजावणी करत आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व वेबकास्टिंग करण्यात येणार असून, तशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मतदारांची माहिती देण्यासाठी प्रत्येक केंद्रावर मतदार सहाय्यता कक्ष उभारण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांना मतदान यादीत नाव शोधण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे, कोरोना संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांच्यासाठी विलगीकरण कक्षही स्थापण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details