महाराष्ट्र

maharashtra

कोरोना : संपुर्ण महाराष्ट्रात जमावबंदी, तरीही समृद्धी काम सुरुच...

By

Published : Mar 23, 2020, 2:40 PM IST

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात रविवारी मध्यरात्रीपासून जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. असे असतानाही राज्य सरकारचा अतिमहत्वाचा प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Samruddhi Highway
समृद्धी महामार्ग

अमरावती - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात रविवारी मध्यरात्रीपासून जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले आहेत. असे असतानाही राज्य सरकारचा अतिमहत्वाचा प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम सुरुच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समृद्धी महामार्गाचे काम बंद असल्याचे तहसीलदार यांनी संगितले असले तरी प्रत्यक्षात काम मात्र सुरुच असल्याचे समोर आले आहे.

जमावबंदी असूनही अमरावतीत समृध्दीचे काम सुरूच...

हेही वाचा...कोरोना इफेक्ट : 31 मार्चपर्यंत नाशकातील नोटा छपाई बंद...!

'कोरोना व्हायरसच्या संदर्भात संवेदनशील महत्त्वाच्या टप्प्यात आहोत. प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातल्या नागरी भागामध्ये १४४ कलम लागू झाली. पाचपेक्षा अधिकजण एकत्र येऊ नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. अशा सुचना आहे. याशिवाय वाहतुक सुध्दा बंद करण्यात आली आहे. मात्र चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड जवळील सुलतानपुर येथे समृध्दी महामार्गाचे काम सुरू आहे. याशिवाय शेलुचिखली येथे पुलाचे बांधकाम सुध्दा सोमवारी सुरू आहे. यामध्ये विशेष म्हणजे आज सोमवारी हजेरी मस्टरवर कोणाचीही सही न घेता काम सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.

सृद्धीच्या कामासाठीच्या या जमावामुळे व याठिकाणी इतर राज्यातील लोकं असल्यामुळे कोरोना पसरण्याची दाट शक्यता आहे. कलम १४४ चे उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकते. कलम १४४ अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अमरावतीचे अधिकारी आता सदर काम बंद करतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या कामाला विशेष सुट का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details