महाराष्ट्र

maharashtra

चिखलदऱ्यातील स्कायवॉकला वनविभागाचा 'रेड सिग्नल'; तर काँग्रेसचे 'सद्बुद्धी महायज्ञ' करून निषेध आंदोलन

By

Published : Jul 17, 2021, 6:31 PM IST

व्याघ्र प्राण्यांच्या अधिवसाचे कारण देत केंद्र सरकारच्या वनमंत्रालयाने स्कायवॉकला परवानगी नाकारली आहे. या विरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक झाली असून चिखलदऱ्यातील स्कायवॉकजवळ युवक काँग्रेसच्यावतीने 'सद्बुद्धी महायज्ञ' करून केंद्र सरकार आणि वनमंत्रालयाचा निषेध करण्यात आला आहे.

chikhaldara skywalk news
chikhaldara skywalk news

अमरावती - जगातील तिसऱ्या आणि भारतातील पहिला काचेचा स्कायवॉक हा विदर्भाचे काश्मीर असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे साकारला जात आहे. या स्कायवॉकचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता काम अंतीम टप्यात आल्याने दरीवरून केबक टाकणे बाकी आहे. परंतु हा भाग व्याघ्र प्राण्यांच्या अधिवसाचा येत असल्याचे कारण देत या कामाला केंद्र सरकारच्या वनमंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. या विरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक झाली असून चिखलदऱ्यातील स्कायवॉक जवळ युवक काँग्रेसच्यावतीने 'सद्बुद्धी महायज्ञ' करून केंद्र सरकार आणि वन मंत्रालयाचा निषेध करण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारने तत्काळ याला परवानगी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारादेखील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

प्रतिक्रिया

केंद्र सरकारचे स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफला पत्र -

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नॅशनल आणि स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफला यासंदर्भात एक पत्र लिहिले होते. या परिसरात घनदाट जंगल असून वन्यप्राण्यांचा अधिवास आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे संवर्धन आणि संरक्षणाची आवश्यकता आहे. नॅशनल आणि स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफला प्रस्ताव सादर करण्याचे केंद्र सरकारने दिले होते. त्यासोबतच प्रोजेक्ट्चा इकोलॉजिकल स्टडी करा आणि त्याचा त्यावर काही परिणाम होतो का, त्या प्रोजेक्टचा वाईल्ड लाईफवर काही परिणाम होतो का, हे ही तपासा असेही केंद्र सरकारच्या पत्रात नमूद करण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात मिळाली होती मान्यता -

विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा, येथील आदिवासींना रोजगार प्राप्त व्हावा, तसेस येथील पर्यटनाला मोठी चालना मिळावी, या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिखलदऱ्यात स्कायवॉक हा प्रकल्प आणला होता. हा प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून उभारल्या जात असून या स्कायवॉकसाठी तबल 34 कोटी खर्च येणार आहेत. हरिकेन पॉइंट ते गोरघाट या दोन दऱ्यांवरून हा 500 मीटर लांबीचा स्कायवॉक असणार आहे. याचे 75 टके कामदेखील पूर्ण झाले आहे.

सिंगल रोपवेवर तयार होणारा जगातील पहिला स्कायवॉक -

चिखलदरा हे सातपुडा पर्वत रांगेत समुद्रसापटीपासून हजारो मीटरवर वसलेले पर्यटन स्थळ आहे. येथील नागमोडी रस्ते, थंड हवा, रिमझिम पाऊस आणि शेजारीच असलेलला मेळघाट व्याघ्र प्रकल्प यामुळे चिखलदऱ्यात पर्यटकांचा ओढा असतो. अशा या चिखलदराच्या पर्यटनात आणखी भर पडणार आहे. कारण येथे काचेचा लांबलचक स्कायवॉक तयार होत आहे. सिडकोच्या माध्यमातून साकारला जाणार हा स्कायवॉक जगातील तिसऱ्या क्रमांकाचा आहे. तर भारतातील पहिला आहे.

हेही वाचा - मुन्ना भाई MBBS.. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी होणार पदवीधर, ५ पैकी ३ विषयांत पास

ABOUT THE AUTHOR

...view details