महाराष्ट्र

maharashtra

MLA Ravi Rana : ...म्हणून मी आमदार रवी राणा यांच्या कानशीलात लगावली; शिवसैनिकानं सांगितल कारण

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 10:23 PM IST

MLA Ravi Rana : अमरावतीत आमदार रवी राणांना काल सायंकाळी एकाने कानशालात लगावल्याची घटना घडली होती. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. यावरुन आमदार रवी राणा हे वारंवार उद्धव ठाकरे आणि शिवसेना विरोधात बोलत असतात. आमदार रवी राणांच्या विरोधात माझ्या डोक्यात प्रचंड राग होता, यामुळे आमदार रवी राणांना कानशीलात लगावल्याचं शिवसेना ठाकरे गटाच्या माजी तालुकाप्रमुख महेंद्र दिपटेंनी सांगितलंय.

मी आमदार रवी राणा यांच्या कानशीलात लगावली
MLA Ravi Rana

महेंद्र दिपटे, माजी तालुकाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

अमरावती MLA Ravi Rana : काल आमदार रवी राणा आणि माझ्यात अचानक वाद झाला. आमदार रवी राणा माझ्यावर चालून येताच मीही त्यांच्या दोन कानशीलात लगावल्या. यानंतर त्यांच्या 80 ते 100 कार्यकर्त्यांनी मला मारलं. ही घटना ठरवून नाही तर अचानक घडल्याचे अंजनगाव सुर्जी येथील शिवसेना ठाकरे गटाच्या माजी तालुकाप्रमुख महेंद्र दिपटे यांनी म्हटलंय. (Ravi Rana Slapped in Amravati)





नेमक काय घडलं : ठाकरे गटाच्या माजी तालुकाप्रमुखांनी याबाबत बोलताना सांगितले की, सोमवारी सायंकाळच्या सुमारास मी माझ्या मुलीला शिकवणीसाठी सोडल्यावर अंजनगाव सुर्जी येथील नवीन बस स्थानक परिसरात दुचाकी वाहनासह उभा होतो. यावेळी आमदार रवी राणांचा स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे माझ्याजवळ येत तू रस्त्यात उभा राहू नको, इथून आमदार रवी राणा यांचा ताफा जाणार असत्याचं सांगितलं. त्यातच आमदार रवी राणा यांची गाडी तिथे आली. याठिकाणी आमदार रवी राणंनी अचानक गाडीखाली उतरत बांगरला मारणारा हाच आहे का असं म्हणत माझ्या दिशेनं चालून आले. आमदार रवी राणा हे वारंवार उद्धव ठाकरे आणि शिवसेना विरोधात बोलत असतात. यामुळे आमदार रवी राणांच्या विरोधात माझ्या डोक्यात प्रचंड राग होता. त्यातच ते माझ्यावर चालून येताच मी त्यांच्या दोन कानशीलात लगावल्या, असं महिंद्र दिपटे यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय. अंजनगाव सुर्जी येथे आमदार रवी राणांचा दहीहंडीचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम हिंदुत्वाचा असल्यामुळे आमदार रवी राणा गावात असताना देखील त्यांच्यासमोर जायचा किंवा कुठलाही वाद घालायचा विचार केला नव्हता. मी मुलीला शिकवणीला सोडल्यावर चौकात एकटाच उभा होतो. ते माझ्यावर चालून आले त्यामgळे हा प्रकार घडला. (Ravi Rana vs Uddhav Thackeray)

आमदार रवी राणांचा आरोप खोटा : या सर्व घटनेवर रवी राणांनी माझ्यावर आठ-दहा शिवसैनिक चाकू घेऊन हल्ला करायला धावले असा आरोप केलाय. हा आरोप चुकीचा असून मला कुठलाही शस्त्राची गरज नाही. आमदार रवी राणांना खरंच माझ्याशी लढायचं असेल तर त्यांनी अमरावती शहरात कुठेही मला बोलवावे. त्यांनी कार्यकर्त्यांसह माझ्याशी लढून दाखवावं असं आवाहन देखील महेंद्र दिपटेंनी आनदार रवी राणांना दिलय.



हेही वाचा :

  1. Attack on MLA Ravi Rana : आमदार रवी राणांवर हात उगारणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला चोप, पोलिसांनी केली कशीबशी सुटका
  2. CM in Amravati : अमरावतीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सिने कलावंतांच्या उपस्थित फुटणार दहीहंडी
  3. Navneet Ranas Claims Rejected: हनुमान चालीसा पठण प्रकरणात नवनीत राणा यांचे आरोप पोलिसांनी आज न्यायालयात फेटाळले

ABOUT THE AUTHOR

...view details