महाराष्ट्र

maharashtra

अमरावती येथील अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्याला तडे

By

Published : Nov 29, 2019, 12:35 PM IST

धरणातील पाणी ज्या मुख्य कालव्याद्वारे शेतकऱ्यांना दिले जाते. त्या मुख्य कालव्याला ठिकठिकाणी मोठे तडे व भगदाड पडले असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या कालव्याला पडलेले तडे शासनाने तत्काळ दुरूस्त करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने केली जात आहे.

amravati
अप्पर वर्धा धरण

अमरावती -शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी दरवर्षी अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येते. मात्र, या मुख्य कालव्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून जिल्ह्यातील तिवसा येथे व अनेक ठिकाणी कालव्याला मोठ-मोठे तडे गेले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असून वर्धा प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.

अप्पर वर्धा धरण

अमरावती विभागातील सर्वात मोठा पाणी प्रकल्प असलेले अप्पर वर्धा धरण यावर्षी झालेल्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळणार आहे. परंतु, धरणातील पाणी ज्या मुख्य कालव्याद्वारे शेतकऱ्यांना दिले जाते. त्या मुख्य कालव्याला ठिकठिकाणी मोठे तडे व भगदाड पडले असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या कालव्याला पडलेले तडे शासनाने तत्काळ दुरूस्त करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details