ETV Bharat / state

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; अमरावती जिल्ह्यात जल्लोष

author img

By

Published : Nov 28, 2019, 10:37 PM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज मुबंईच्या शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला. त्यामुळे, जिल्ह्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.

amravati
आतिषबाजी

अमरावती- राज्यात ऐतिहासिक घडामोडी घडल्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीची आज सत्ता स्थापन झाली. उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच व अन्य ६ मंत्र्यांचा शपथविधी होताच जिल्ह्यात ठिक-ठिकाणी तिन्ही पक्षांनी सार्वत्रिक जल्लोश करत फटाक्यांची आतषबाजी केली.

जल्लोष करताना महाविकास आघाडीचे कार्यकर्ता

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज मुबंईच्या शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला. त्यामुळे, जिल्ह्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. कधी काळी शिवसेना नेते काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षावर तोंडसुख घ्यायचे. मात्र, आज तिन्ही पक्षाचे नेते विजय उत्सवात एकत्र दिसून आले.

हेही वाचा- उपकुलसचिवांनी विद्यापीठाला लावला 39 हजारांचा चुना; कुलगुरुंनी दिले चौकशीचे आदेश

Intro:अमरावती जिल्हात सत्ता स्थापनेचा ठिकठिकाणी जल्लोष
ढोल ताशेच्या फटाक्याची आतषबाजी

अमरावती अँकर
राज्यात ऐतिहासिक घडामोडी घडल्या नंतर शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडीची आज सत्ता स्थापन झाली त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची व अन्य सहा मंत्र्यांचा शपथविधी होताच अमरावती जिल्हात ठीक ठिकाणी तिन्ही पक्षांनी सार्वत्रिक जल्लोश करत फटाक्यांची आतषबाजी केली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुबंईच्या शिवतीर्थावर दिमाखात मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला त्यामुळे या सत्ता स्थापनेचा प्रचंड जल्लोष आज अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी व महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्षच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केला. कधी काळी शिवसेना नेते काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षावर तोंडसुख घ्यायचे मात्र आज तिन्ही पक्षाचे नेते विजय उत्सवात एकत्र दिसून आलेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.