महाराष्ट्र

maharashtra

Examinee in Abmulance : अपघातग्रस्त परीक्षार्थी रुग्णवाहिकेतून पोहोचला परीक्षा केंद्रावर

By

Published : Mar 15, 2022, 12:41 PM IST

Updated : Mar 15, 2022, 3:13 PM IST

महिनाभरापूर्वी गंभीर अपघातातून बचावलेला सार्थक अनिल लांडे हा विद्यार्थी आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचला. तो आज थेट रुग्णवाहिकेतून शहरातील खापर्डे बगीचा स्थित आदर्श शाळा या परिक्षा केंद्रावर पोहोचला.

injured examinee
अपघातग्रस्त परीक्षार्थी

अमरावती -महिनाभरापूर्वी गंभीर अपघातातून बचावलेला सार्थक अनिल लांडे हा विद्यार्थी ( Injured Student at Exam Centre ) आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचला. तो आज थेट रुग्णवाहिकेतून शहरातील खापर्डे बगीचा स्थित आदर्श शाळा ( Adarsh School Khaprde Bagicha ) या परिक्षा केंद्रावर पोहोचला.

याबाबत ईटीव्ही भारतचा रिपोर्ट

सार्थक साठी परीक्षा केंद्रावर विशेष व्यवस्था -

अपघातानंतर सार्थकच्या पायावर येथील पारिजात रुग्णालयात डॉ. तक्षक देशमुख यांनी शस्त्रक्रिया केली. अशा अवस्थेत परीक्षा द्यायचीच अशी जिद्द कायम ठेवणाऱ्या सार्थकसाठी आदर्श शाळेत विशेष व्यवस्था करण्यात आली. रुग्णालयातून परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या सार्थकला या शाळेतील इयत्ता नववीचा विद्यार्थी लेखनिक म्हणून देण्यात आला. रुग्णवाहिकेतच पेपर सोडवता येईल का याची व्यवस्था करण्यात आली. मात्र प्रचंड गरमीमुळे रुग्णवाहिकेत परीक्षा देणे शक्य नसल्यामुळे शाळेतील प्रयोग शाळेसमोर असणाऱ्या व्हरांड्यात मोकळ्या जागी दोन मोठे टेबल टाकून त्यावर सार्थक ला स्ट्रेचरवर झोपविण्यात आले. त्याच्या बाजूला लेखनिकाला बसविण्यात आले. या ठिकाणी पाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. दहावीचे सर्व पेपर सार्थकला व्यवस्थित सोडवता येईल याची संपूर्ण व्यवस्था आम्ही केली असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका स्वामिनी आळशी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या.

अपघातग्रस्त परिक्षार्थी

हेही वाचा -शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदी योग्य, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

15 फेब्रुवारीला झाला होता अपघात -

प्रवीण नगर येथील रहिवासी असणारा सार्थक हा 15 फेब्रुवारी ला शिकवणी वर्गातून शाळेत जात असताना शाळेलगतच असणाऱ्या एका औषधी दुकानासमोर एका ट्रकने सार्थकच्या सायकलला धडक दिली आणि ट्रकचे एक चाक सार्थकच्या डाव्या पायावरून गेले. या अपघातात सार्थकच्या डाव्या पायाची त्वचा सोलली गेली. सार्थकचे वडील हे येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टर असून त्यांनी त्यांचे सहकारी डॉ. तक्षक देशमुख यांच्याकडून पारिजात रूग्णालयात सार्थकवर उपचार केले. सार्थक पूर्णतः बरा होण्यासाठी आणखी चार ते पाच महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती त्याचे वडील डॉक्टर अनिल लांडे यांनी' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

Last Updated :Mar 15, 2022, 3:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details