महाराष्ट्र

maharashtra

Amravati Latest News : अमरावतीत हवेत गोळी झाडून फिल्मी स्टायलने युवतीला पळविले

By

Published : Mar 8, 2022, 2:13 PM IST

हवेत गोळीबार करत दोन युवकांनी युवतीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी दोघांना अटक ( Rajapeth police arrested both ) केली आहे.

Rajapeth
Rajapeth

अमरावती :बंदुकीची गोळी हवेत झाडून दोन युवकांनी युवतीला पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या ( Rajapeth Police Station ) हद्दीत येणाऱ्या बालाजी प्लॉट येथे घडली. हा प्रकार सोमवारी मध्यरात्रीनंतर घडला. या प्रकरणी सध्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर युवती व दोन युवकांचा पोलीस शोध घेत आहेत.

अशी आहे घटना -

नागपुरात राहणारी तरुणी अमरावतीला तिच्या मोठ्या बहिणीच्या बालाजी प्लॉट येथील घरी एका कार्यक्रमाला आली होती. रात्री दोन तरुण दुचाकीवर तेथे आले. तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी नातेवाईकांनी विरोध केल्यावर, एका तरुणाने कमरेला लटकविलेले पिस्तुल काढून हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर तरुणीला बळजबरीने गाडीवर बसविले आणि पळवून नेले.

लव्ह स्टोरीतून घडला हा प्रकार -

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली. त्यानंतर नाकाबंदी दरम्यान नांदगाव पेठ टोलनाक्यावर ( Nandgaon Peth toll plaza ) दोन मुलांना अटक करण्यात आली. प्रफुल्ल दमाये (20) आणि प्रमेश आटपाका (32) अशी त्यांची नावे असून दोघेही नागपूरचे रहिवाशी आहेत. पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेत गोळीबार करणाऱ्या मुलाचे या मुलीशी प्रेमसंबंध आहेत. नागपूरहून चार मित्र आले होते. दोन मित्र दुचाकीने बालाजी प्लॉटमध्ये आले. अन्य दोन नांदगाव पेठ टोलनाक्यावर थांबले होते. ज्या मुलाचे या मुलीशी प्रेमसंबंध होते, त्या मुलाने हवेत गोळीबार करत युवतीला घेऊन पळ काढला. पोलीस तरुणीसह दोन्ही तरुणांचा कसून शोध घेत आहेत. बालाजी प्लॉट परिसरासह ( Incidents in the Balaji Plot area ) संपूर्ण शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details