महाराष्ट्र

maharashtra

Fake Doctor Detained in Amravati : अमरावतीत सापडला बोगस डॉक्टर ; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

By

Published : Jan 15, 2023, 5:35 PM IST

अलीकडेच बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून अमरावती शहरापासून २५ किलोमीटरवर असणाऱ्या शिराळा या गावात अशाच एका बोगस डॉक्टर असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीएएमएस पदवीच्या नावावर रुग्णालय चालवण्याऱ्या या बोगस डॉक्टर विरुद्ध पंचायत समितीच्या आरोग्य विस्तारअधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समीर बाला असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.

Fake doctor detained in amravati
अमरावतीत सापडला बोगस डॉक्टर

अमरावती :शिराळा गावामध्ये समीर बाला याने आपले खाजगी रुग्णालय गेल्या काही वर्षापासून सुरू केले होते. मुळव्याध, भगंदर, फिशर यासंबंधीचे उपचार या रुग्णालयातून तो करत होता. उपचार घेण्यासाठी दूरवरून रुग्ण त्याच्याकडे येत होते. त्याच्या उपचाराने रुग्ण बरे होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. प्रशासन स्तरावर सध्या बोगस डॉक्टर शोधण्याची मोहीम सुरू आहे. अशातच अमरावती पंचायत समितीच्या अंतर्गत बोगस डॉक्टर समितीच्या पथकाने कारवाई करत बोगस डॉक्टर बाला यांच्या रुग्णालयाची तपासणी केली. त्यादरम्यान डॉ. बाला यांच्या रुग्णालयात पथकातील अधिकाऱ्यांना रुग्णालयात मोठ्या प्रमाणामध्ये औषधी साठा आढळला होता.

हेही वाचा :भिवंडीत आणखी तीन बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करून अटक

पोलिसांनी गुन्हा दाखल केला : पथकाने डॉक्टर बाला याला त्याचे नोंदणी प्रमाणपत्र मागितले असता डॉ. बालाने डॉक्टर मोहीब अरहील नसीब अहमद खान यांच्या नावाचे एमबीबीएस प्रमाणपत्र दाखवले. सदर प्रमाणपत्र हे त्याचे स्वतःचे नसून अन्य व्यक्तीचे असल्याचे तपासणी दरम्यान पथकाच्या लक्षात आले. पथकाने संपूर्ण चौकशी करून डॉक्टर बाला याचे रुग्णालय सील केले. चौकशीच्या अंतिम टप्प्यात दुपारी वलगाव पोलीस ठाण्यात विस्तार अधिकारी राम कृष्णराव पिंजरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळताच बोगस डॉक्टरने गावातून पोबारा केला. त्या बोगस डॉक्टरच्या शोधात पोलीस पथक रवाना केल्याचे पोलिसांनी सांगितले.



शेंदुर्जनाघाट मध्ये आढळले होते २ बोगस डॉक्टर :२२ मे २०२२ रोजी शेंदूरजनाघाट येथे आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या मदतीने २ बोगस डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परवाना नसताना देखील बोगस डॉक्टर वैधकीय सेवा देत असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून बोगस डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला मिळाल्या होत्या. तेंव्हा आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई केली होती. पोलिसांनी २ बोगस डॉक्टरांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र वैधकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अन्वये गुन्ह्याची नोंद केली होती. तरी देखील बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. त्यामुळे रुणांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने ठोस पाऊले उचलून याच्यावर कडक कारवाई करावी असा सूर परिसरातून उमटत आहे.

हेही वाचा :कोरोना काळात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट 155 डॉक्टरांवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details