महाराष्ट्र

maharashtra

वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात आढळला मृतदेह, स्थानिकांनी ठेवला बांधून

By

Published : Feb 6, 2020, 9:33 AM IST

Updated : Feb 6, 2020, 10:58 AM IST

वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात तिवसा गावजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

dead body found in wardha dam
वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात तिवसा गावजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला.

अमरावती -अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात तिवसा गावाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान सापडलेल्या संबंधित मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्याजवळ काम करणाऱ्या काही मजुरांचे लक्ष कालव्याकडे गेले. यावेळी त्यांना मृतदेह वाहताना दिसला. त्यांनी तत्परता दाखवत तो दोरीच्या साहाय्याने बांधला; आणि पोलिसांशी संपर्क साधला. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित व्यक्तीचे वय चाळीस वर्षाच्या जवळपास असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

48 तास शरीर पाण्यात राहिल्याने चेहऱ्यावर बुरशी आली होती. तसेच वाहत्या पाण्यात खरचटल्याने शरीरावर काही जखमा दिसत होत्या. त्यामुळे मृतदेह विच्छेदनासाठी अमरावती येथे पाठवण्यात आला आहे.

Intro:अमरावती:अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात आढळला अनोळखी इसमाचा नग्न अवस्थेतील मृतदेह.

तिवसा परिसरातील धक्कादायक घटना.

अमरावती अँकर .

अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात तिवसा गावजवळ एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना आज दुपारी समोर आली आहे.अद्यापही या अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्या जवळ काम करणाऱ्या काही मजुरांचे लक्ष कालव्या कडे गेले असताना. त्यांना हा मृतदेह पाण्यात वाहत जात असल्याचे दिसताच त्यांनी मृतदेह हा दोरीच्या साह्याने बांधून ठेवला व त्यानंतर तिवसा पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी येऊन कालव्यातून मृतदेह दोरीच्या साह्याने बाहेर काढला. सदर व्यक्तीच्या अंगावर एकही कपडा नसून व्यक्तीचे वय अंदाजी 40 ते 42 असल्याचे समजते. मृतक शरीरावर कुठलीही ओळख खून नसून 48 तास याच्यावर शरीर पाण्यात राहिल्यामुळे चेहऱ्यावर बुरशी चढल्याचे दिसून आले तसेच वाहत्या पाण्यात खर्चटल्याने हाताचे व पायाचे मास गेले आहे अजून पर्यंत या व्यक्तीची ओळख पटली नाही त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated :Feb 6, 2020, 10:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details