महाराष्ट्र

maharashtra

Anjangaon Surjee : अंजनगाव सुर्जी येथे पुन्हा पिस्तुलसह सहा जिवंत काडतूस जप्त

By

Published : Dec 8, 2022, 2:11 PM IST

26 year old man was arrested by police
26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक ()

अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या ( Anjangaon Surjee Police Station ) हद्दीत पुन्हा एकदा एक पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक ( 26 year old man was arrested by police ) केली आहे.

अमरावती :अवघ्या चार दिवसात जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या ( Anjangaon Surjee Police Station ) हद्दीत पुन्हा एकदा एक पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात रिजवान उर्फ सोनू अहमद खान या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक ( 26 year old man was arrested by police ) केली आहे.

दीपक वानखडे पोलीस निरीक्षक अंजनगाव सुर्जी


पाच दिवसात दुसरी घटना :अंजनगाव सुर्जी येथे चार डिसेंबर रोजी पोलिसांनी तीन पिस्तुलसह आठ जिवंत काडतुस लगतच्या लखाड गावातून जप्त केल्या होत्या. या प्रकरणात मोहम्मद नावेद उर्फ गुड्डू अब्दुल सलीम या 30 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली होती. ही घटना ताजी असताना बुधवारी रात्री पोलिसांना शहरातील रिजवान या युवकाकडे पिस्टल आणि काडतुस असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शहरातील पानअटाई, खिडकीपुरा या परिसरात राहणाऱ्या रिजवानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता माझ्याकडे पिस्टल होती. मात्र पोलिसांनी चार दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईनंतर मी भीती वाटल्यामुळे ती फेकून दिली असल्याची माहिती दिली.


तोफनालाच्या पुलाखाली आढळली पिस्टल :दरम्यान रिजवान याने आपल्याकडे असणारी पिस्टल आणि सहा काडतुस अंजनगाव ते परतवाडा मार्गावर असणाऱ्या गळती गावाजवळील तोफनाल्यावरील पुलाच्या खाली लपवली असल्याची माहिती पोलिसांना दिली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तोफनाल्याच्या खाली असणारी पिस्टल अडीच सहा काढतोस शोधून काढलीत. या प्रकरणात रिजवानला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती अंजनगाव सुजी चे पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांनी दिली. सलग चार दिवसाच्या अंतराने अंजनगाव सुरजी परिसरात पिस्टल आणि जिवंत काडतूस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंजनगाव सुरजीसह लगतच्या गावांमध्ये आणखी अनेक घरांमध्ये पिस्टल आणि काडतूस सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details