महाराष्ट्र

maharashtra

Amravati Graduate Constituency :  संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा धीरज लिंगाडे यांना पाठिंबा

By

Published : Jan 25, 2023, 8:10 PM IST

अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे, अशातच सर्व पक्षांमध्ये हालचालींना अधिक गती मिळाली आहे. संयुक्त रिपब्लिकन आघाडी या पक्षाने आज महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना आपला पाठिंबा देत असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगितले.

Amravati Graduate Constituency Election; Support to Dheeraj Lingade of United Republican Alliance
अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा धीरज लिंगाडे यांना पाठिंबा

अमरावती : बहुजन समाजातल्या छोट्या-मोठ्या गटांनी एकत्र येत संयुक्त रिपब्लिकन आघाडी हा पक्ष स्थापन केला आहे. दीड वर्षे पूर्वी या आघाडीची स्थापना झाली आहे. अॅडव्होकेट पीएस खडसे हे या आघाडीचे अध्यक्ष आहेत. येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला 15 जागा द्याव्यात. या अटींवर आम्ही हा पाठिंबा धीरज लिंगाडे यांना जाहीर करीत असल्याचे अॅडव्होकेट पीएस खडसे यांनी पत्रकार परिषदेतून आज येथे सांगितले.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा :यासंदर्भात काँग्रेस पदाधिकारी सुनील देशमुख, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे तसेच आदी पदाधिकाऱ्यांशी कालच बैठक झाली असून, त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेत हा पाठिंबा जाहीर करीत असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे.

संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे अभियान :संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे 'रिपब्लिकन जोडा, बंधुभाव वाढवा' हे अभियान एक वर्षापासून सुरू आहे. पदवीधरांना आपल्या समाजाच्या हक्काची जाणीव असते व त्या हक्कासाठी संघर्ष करणे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. त्यासाठी समाजामध्ये हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई असा कोणताही धर्मभेद करता की, या ब्राह्मण, शुद्र असा कोणता वर्णभेद न करता मी भारतीय आहे.

परिवर्तनाची गरज : भारतातील प्रत्येक व्यक्ती हा माझा बंधू आहे. ही राष्ट्रीय बंधुभावना घेऊन ती वाढवण्याचे अभियान संयुक्त रिपब्लिकन आघाडीने सुरू केले आहे. भारतात असणाऱ्या लोकशाहीचा व राज्यघटनेचा समता, स्वातंत्र्य बंधुतेचा विचार रिपब्लिकन आघाडी जनतेमध्ये रुजवण्याकरता नेहमीच कार्य करते. देशात वाढणारी महागाई बेरोजगारी गरीबी हटवण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. राजकीय परिवर्तन घडल्याशिवाय लोकशाही कधीही सुदृढ होऊ शकत नाही.

एकहाती सत्ता हे हुकूमशाहीचे लक्षण : देशात असणाऱ्या घटनात्मक संस्था या जर राजकीय सत्ता त्याचा दुरुपयोग करून लोकांना त्रास देण्यासाठी त्याचा उपयोग करीत असतील किंवा त्या घटनात्मक संस्थेवर आपला अंकुश ठेवत असतील. व त्यांनी सत्ता सांगते त्याप्रमाणे वागावे असे जर घडत असेल तर ती हुकूमशाहीची नांदी आहे

.

घटनेत बदल करण्याचे षडयंत्र : या सर्व प्रकारात जर देशाच्या घटनेत बदल करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे वेळीच भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की, भारतातील नागरिकांनी सत्तेत बदल करण्यासाठी मतदान हक्क कर्तव्य बजावायचे असते. या निवडणुकीच्या निमित्ताने या पदवीधर मतदारसंघातून पदवीधर मतदारांना आपले हक्क बजावण्याकरता संधी मिळालेली आहे या संधीचा खऱ्या अर्थान देशाची लोकशाही वाचवण्याकरता आवाहन संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.

संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या पत्रकार परिषदेला मान्यवर :पत्रकार परिषदेला संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर पीएस खडसे रिपब्लिकन पक्ष खोरिया, राष्ट्रीय सचिव गोपीचंद मेश्राम, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रा. विनायकराव दुधे, विदर्भाचे सचिव प्राध्यापक सतीश शियाले, रिपब्लिकन पक्ष खौरीपचे महाराष्ट्राचे सचिव रमेश रामटेके, भारतीय दलित पॅंथरचे प्रमुख हरिदास शिरसाठ साची फाउंडेशन संघटक प्रमुख जगदीश गोवर्धन प्रतिक पाटील मनोज धुळेकर वैशालीकडे प्रवीण सरोदे किशोर पालेकर अजय रामटेके आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details