महाराष्ट्र

maharashtra

Sangharsh Yatra : उपमुख्यमंत्र्यांना खारपाणपट्यातील पाणी पाजण्यासाठी निघाली 'संघर्ष यात्रा'

By

Published : Apr 10, 2023, 9:24 PM IST

Updated : Apr 10, 2023, 9:40 PM IST

अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि अकोला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या ६९ गावातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि अकोला महानगरपालिका क्षेत्राकरिता असलेल्या योजनेच्या पाणी आरक्षणाला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)तर्फे ६९ गावातील ग्रामस्थांना घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षयात्रा सोमवारी काढण्यात आली. यात्रा जुने शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरापासून रवाना झाली.

Sangharsh Yatra Akola
संघर्ष यात्रा

संघर्ष यात्रेतून उद्धव ठाकरे गटाचा एल्गार

अकोला:मागील काही दिवसांपासून ६९ गावातील खारे पाणी जमा करण्यात येत असून, हे पाणी टॅंकरमधून नागपूरला दिंडीतून नेण्यात येणार आहे. हेच खारे पाणी स्थगिती देणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिण्याची आणी त्याच पाण्याने आंघोळ करण्याची विनंती करण्यात येईल. दरवर्षी बाळापूर व अकोला तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होत असल्याने बाळापूर तालुक्यातील ५३ गावे आणि अकोला तालुक्यातील १६ गावे अशा एकूण ६९ गावांसाठी जल जीवन मिशनअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात या योजनेला सर्व मान्यता प्रदान करून निधीही मंजूर करण्यात आला होता.

संघर्ष यात्रेत सामील शिवसेनेचे पदाधिकारी


असे आहे कामाचे नियोजन: ६९ गावांना पाणी पुरवठा योजनेसाठी वान प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आले आहे. ४३ कि.मी. अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे नियोजन आहे. याला अनुसरून २७ कि.मी.अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. अंतर्गत २२८ पैकी १०८ कि.मी. अंतरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. योेजनेतील नियमांप्रमाणे २१९ कोटींच्या या योजनेवर आतापर्यंत १२५ कोटींचा खर्च झाला असून, ९२ कोटी रुपये कंत्राटदाराला अदाही करण्यात आले आहेत.

भगवे ध्वज घेऊन निघाली संघर्ष यात्रा


उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात काम स्थगित: आता पालकमंत्री स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यानंतरही त्यांनी जिल्ह्यातील योजना स्थगित ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे अकोला ते उपमुख्यमंत्री राहत असलेल्या नागपूरपर्यंत पायी दिंडी काढण्यात येणार असल्याचे, असे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी सांगितले होते. त्यानुसार राजराजेश्वर मंदिरापासून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे.


यात्रेचा असा आहे प्रवास:दिंडी जयहिंद चौक, महाराणा प्रताप चौक (सिटी कोतवाली), गांधी चौक, मदनलाल धिंग्रा चौक (मध्यवर्ती बस स्थानक), टॅावर चौक, रतनलाल प्लॅाट चौक, जठारपेठ, उमरी, गुडधीमार्गे घुसरकडे रवाना होईल. दिंडीचे नागपूरपर्यंत ९ ठिकाणी मुक्काम राहणार आहे. पहिला मुक्काम अंबिकापूर येथे तर शेवटचा मुक्काम १९ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील धामना येथे राहणार आहे. त्यानंतर २१ तारखेला उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दिंडी पोहोचणार आहे.


राजराजेश्वराचे केले पूजन:राज राजेश्वर मंदिरामध्ये ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महाआरती करून संघर्ष यात्रेला सुरुवात केली. 69 गावातील कार्य पाणी जमा करून टँकरद्वारे हे पाणी नागपूर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना हे पाणी पाजून 69 पाणीपुरवठा योजनेला देण्यात आलेली स्थगिती उठवण्याची मागणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा:Rakhi Sawant Kiss Case : मिका सिंगने बळजबरीने घेतला होता राखीचा किस; न्यायालयाने सांगितले की....

Last Updated :Apr 10, 2023, 9:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details