महाराष्ट्र

maharashtra

बार्शीटाकळी तालुक्यात पिंजर येथे भीषण आग, जीवितहानी नाही

By

Published : Apr 26, 2019, 9:38 PM IST

आगीने जवळपास ३-४ एकराचा परिसर विळख्यात घेतला होता. मात्र, गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. आज अकोल्याचे तापमान ४६.४ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बार्शीटाकळी तालुक्यात पिंजर येथे लागलेली आग

अकोला - बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या शेजारी गुलतुरा पांदण रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास मोठी आग लागली. हळूहळू ही आग बसस्थानक आणि पोलीस निवासस्थानाजवळ पोहोचली. मात्र, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथक तसेच ग्रामस्थांना आग विझवण्यात यश मिळाले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

बार्शीटाकळी तालुक्यात पिंजर येथे लागलेली आग

सुरुवातीला जिल्हा परिषद कन्या शाळेच्या बाजुने गुलतुरा पांदण रस्त्यावर आग लागली. त्यानंतर या आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याची माहिती वासुदेव वेरुळकार यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आगीचे ठिकाण गाठले. एवढेच नाहीतर सदाफळे यांनी पोलीस निवसास्थानापासून ते जिनींग प्रेसिंगच्या कम्पाउंडपर्यंत ५ फूट रुंदीचा गॅप पाडून घेतला. त्यामुळे बसस्थानाकडे येण्यापासून थांबवण्यात आले. मात्र, बाकी परिसरात आग धगधगत होती. आगीने जवळपास ३-४ एकराचा परिसर विळख्यात घेतला होता. मात्र, गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. आज अकोल्याचे तापमान ४६.४ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Intro:अकोला - बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या बाजुने गुलतुरा पांदन रस्त्यावर मोठी आग लागली. हळूहळू ही आग बसस्थानक व पोलिस निवासस्थानाजवळ पोहोचली. पिंजर पोलिस, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक व ग्रामस्थांनी ही आग विझविली. ही घटना आज दुपारी घडली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. अकोल्याचे तापमान आज 46.4 अंश होते. ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.Body:जिल्हा परिषद कन्या शाळेच्या बाजुने गुलतुरा पांदन रस्त्यावर सुरवातीला मोठी आग लागली. त्यानंतर या आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग काही क्षणातच गुलतुऱ्याकडुन बसस्थानकाकडे व पोलिस निवासस्थानाकडे मोठया वेगाने आग वळली. आग लागल्याची माहिती वासुदेव वेरुळकार यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली. त्यांनी आपल्या सहकाऱ्ययांना सोबत घेऊन आगीचे ठिकाण गाठले. गोपाल वेरुळकार यांची बोर चालु करुन अगदी लहान लहान मुलांनी बकेटा भरु भरुन आनुन दील्या. यामुळे गावाकडे येत असलेल्या आगीला विझविण्यात यश आले. लगेच काही क्षणातच गुलतु-या कडुन बसस्थानकाकडे व निवासस्थानाकडे मोठया वेगाने आग वळली. पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नंदकीशोर नागलकर यांनी जवळ असलेली बोर चालु केली आणी नागरिकांना पाईप लाईनद्वारे पाणी उपलब्ध करून दिले. लगेच दीपक सदाफळे यांनी पिर मोहम्मद यांना सांगुन यांच्या ट्रॅक्टरने निवासस्थानाची आवरभिंतपासुन तर जिनिंग प्रेसिंगच्या कंम्पाउंट पर्यंत नांगरुन पाचफुट रुंदीचा गॅप पाडुन घेतला. यामुळे आगीला बसस्थानकाकडे येण्यापासुन थांबविण्यात आले. परंतु, बाकी परिसरात ही आग धगधगत होती. जवळपास तीन-चार एकराचा परिसर या आगीने आपल्या विळख्यात घेतला होता. मात्र, गावकऱ्याच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळविता आले.
विशेष म्हणजे, ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. या आगीत जीवितहानी झाली नाही. तर ही आग 46.4 अंश तापमानामुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details