महाराष्ट्र

maharashtra

बार्शीटाकळी तालुक्यात बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांचा मृत्यू

By

Published : Jan 27, 2021, 10:42 PM IST

बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथील सत्तर कोंबड्या आठ दिवसाआधी मृत सापडल्या होत्या. या कोंबड्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने घेतले होते. यात कोबंड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Animal Husbandry Akola
पशुसंवर्धन अकोला

अकोला - बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथील सत्तर कोंबड्या आठ दिवसाआधी मृत सापडल्या होत्या. या कोंबड्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने घेतले होते. यात कोबंड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा -अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याच्या हट्टापायी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बार्शीटाकळी तालुक्यातील, तथा पिंजर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पिंपळगाव चांभारे येथील रमेश सुरडकर यांच्याकडे असलेल्या घरगुती वागविलेल्या 70 कोंबड्या 21 जानेवारी रोजी मृत्यू पावल्या होत्या. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे कळत नसल्याने पशुसंवर्धन विभागाने या मृत कोंबड्यांचे नमुने घेतले. हे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. तो अहवाल 26 जानेवारीला प्राप्त झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने याबाबत जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने पिंपळगाव चांभारे येथील श्री. सुरडकर यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे असलेल्या दहा कोंबड्याना मारून त्या जमिनीत पुरल्या, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त डॉ. तुषार बावणे यांनी सांगितले.

मोरगाव भाकरे येथील शेतात आढळले मृत पक्षी

बाळापूर तालुक्यातील मोरगाव भाकरे या गावातील रस्त्यावर असलेल्या झटाले यांच्या शेतात दोन वेगवेगळ्या जातीचे पक्षी मृत मिळून आल्याने पशुसंवर्धन विभागाने त्यांचे नमुने घेवून पुणे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त डॉ. तुषार बावणे यांनी सांगितली.

हेही वाचा -मोदीजींनी आत्मचिंतन कराव - राज्यमंत्री बच्चू कडू

ABOUT THE AUTHOR

...view details