महाराष्ट्र

maharashtra

भीम आर्मीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; एनआरसी, सीएए कायद्याला विरोध

By

Published : Jan 28, 2020, 10:47 AM IST

भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी एनआरसी आणि सीएए कायद्यांना जोरदार विरोध केला आहे. त्यांचे अनुकरण करत अकोल्यात मोर्चा काढण्यात आला.

भीम आर्मीच्यावतीने काढण्यात आलेला मोर्चा
भीम आर्मीच्यावतीने काढण्यात आलेला मोर्चा

अकोला -भीम आर्मीनेराष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भीम आर्मीचे अकोला अध्यक्ष फिरोज खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

भीम आर्मीच्यावतीने काढण्यात आलेला मोर्चा


केंद्र सरकार एनआरसी आणि सीएएमुळे देशात दुफळी माजवण्याचे काम करत आहे. असा अमानुष कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी भीम आर्मीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली. या मोर्चात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा - 'बहीण म्हणून विनंती करतो, पंकजा मुंडेंनी 6 महिने सरकारला वेळ द्यावा'
एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी या कायद्यांना जोरदार विरोध केला आहे. त्यांचे अनुकरण करत अकोल्यात मोर्चा काढण्यात आला.

Intro:अकोला - एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात भीम आर्मीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला. या मोर्चात पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांच्याविरोधात नारेबाजी करण्यात आली. यावेळी आर्मीचे अध्यक्ष फिरोज खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
Body:एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात देशभरात विरोध होत आहे. अकोल्यात ही भीम आर्मीने विरोध करीत मोर्चा काढला. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. यावेळी मोर्चेकऱ्यानी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्याविरोधात नारेबाजी करीत हा कायदा रद्द करा, अशी मागणी केली. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

बाईट - अंकित मेश्राम
भीम आर्मी विद्यार्थी अध्यक्ष, अकोला.Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details