महाराष्ट्र

maharashtra

Bacchu Kadu Bail Granted : मंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

By

Published : Apr 28, 2022, 7:40 PM IST

Updated : Apr 28, 2022, 8:05 PM IST

Minister Bacchu Kadu
मंत्री बच्चू कडू ()

अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu Bail Granted) यांच्यावर प्रथमश्रेणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी कलम 156 (3) नुसार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पालकमंत्र्यांनी सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालयाने आज निकाल देत पालकमंत्री कडू यांना 9 मे पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

अकोला - जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu Bail Granted) यांच्यावर प्रथमश्रेणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी कलम 156 (3) नुसार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पालकमंत्र्यांनी सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालयाने आज निकाल देत पालकमंत्री कडू यांना 9 मे पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला.

माहिती देताना ऍड. बी. के. गांधी

काय आहे प्रकरण? - अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. दरम्यान जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 13 कामांना स्थगिती दिल्याने आता पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितने केली आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवेधन पुंडकर यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने यामध्ये कमल 156 (3) नुसार पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

बच्चू कडूंना जामीन मंजूर - त्यानुसार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पालकमंत्री कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पालकमंत्री कडू यांनी जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. "सत्र न्यायालयाने यामध्ये दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पालकमंत्री कडू यांना 9 मे पर्यंत जामीन मंजूर केला आहे. पालकमंत्री कडू यांच्याकडून ऍड. बी. के. गांधी यांनी काम पाहिले.

Last Updated :Apr 28, 2022, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details