महाराष्ट्र

maharashtra

Bachchu Kadu : दिव्यांगांसाठी हवे स्वतंत्र कल्याण मंत्रालय; बच्चु कडूचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By

Published : Aug 4, 2022, 12:41 PM IST

Bachchu Kadu : अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिव्यांगासाठी स्वतंत्र कल्याण मंत्रालयाची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात 26 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र दिले आहे.

Bachchu Kadu
Bachchu Kadu

अकोला - आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिव्यांगासाठी स्वतंत्र कल्याण मंत्रालयाची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात 26 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र दिले आहे.

समाज कल्याण विभागाच्या मंत्रालयाची स्थापना -महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मागासवर्गीय महिला व बालकल्याण विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय कल्याण अपंगाचे विविध दुर्लक्षित घटकांचे कल्याणासाठी समाज कल्याण विभागाच्या मंत्रालयाची स्थापना केली होती. कालांतराने विविध कल्याणकारी घटकांच्या प्रशासकीय कामाचा व्याप वाढत गेला. प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या कल्याणाची उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने समाजकल्याण विभागातून एक कल्याणकारी घटक स्वतंत्र करून त्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांना पत्र - दिव्यांग कल्याण आयुक्तालय स्वतंत्र करण्यात आले असले, तरी दिव्यांग आयुक्तालयाचे व विभागाचे संपूर्ण नियंत्रण सामाजिक न्याय विभागाकडेच आहे. दिव्यांग देखील समान व्यवस्थित अत्यंत दुर्लक्षित घटक असून या घटकाच्या विशेष कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय असणे, अत्यंत गरजेचे असल्याचे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावर नाराजी - राज्यात आरोग्य विभागाच्या नुकत्याच पार पडल्या. मात्र काही ठिकाणी पेपर फुटल्याचे आरोप झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पेपर फुटल्याने मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होताना दिसतो आहे. त्यामुळे आता लोकशाहीत पैसा महत्वाचा ठरताना दिसत आहे असे कडू म्हणाले. गोरगरीब विध्यार्थी मेहनतीने अभ्यास करतात. गरीब विध्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यातील पेपर फुटीच्या घटना या गंभीर आहेत. याची तात्काळ चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

हेही वाचा -Cabinet Expansion Date : अखेर शिंदे सरकारला मिळाला मुहूर्त; 'या' तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार

हेही वाचा -IB Red Alert On Indian Independence day 15 August: स्वातंत्र्य दिनी मोठ्या घातपाताची शक्यता, अलर्ट जारी

ABOUT THE AUTHOR

...view details