महाराष्ट्र

maharashtra

अकोला शहर पोलिसांची आता सायंकाळी 'एरिया डॉमिनन्स पेट्रोलिंग'

By

Published : Apr 2, 2021, 10:07 PM IST

शहरात छोट्या घटनेचे रूपांतर एखाद्या मोठ्या घटनेत होण्यास वेळ लागत नाही. विशेष करून सायंकाळी शहरात वाहनांची व सर्वसामान्य नागरिकांची गर्दी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक चौकात, मिश्र वस्तीमध्ये आता पोलिसांचा वावर असणार आहे. सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत 'एरिया डॉमिनन्स पेट्रोलिंग' सुरू करण्यात आली आहे.

पोलीस पेट्रोलीग
पोलीस पेट्रोलीग

अकोला - शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना वाढावी. तसेच सायंकाळनंतर लावण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. या उद्देशाने पोलीस अधीक्षकांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकाऱ्यांना 'एरिया डॉमिनन्स पेट्रोलिंग' चे आदेश दिले आहे. शहरातील संवेदनशील पोलीस स्टेशन व मिश्र वस्तीत ही 'एरिया डॉमिनन्स पेट्रोलिंग' सुरू करण्यात आले आहे.

अकोला पोलीस

अकोला शहर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. शहरात छोट्या घटनेचे रूपांतर एखाद्या मोठ्या घटनेत होण्यास वेळ लागत नाही. विशेष करून सायंकाळी शहरात वाहनांची व सर्वसामान्य नागरिकांची वाढती गर्दी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक चौकात, मिश्र वस्तीमध्ये आता पोलिसांचा वावर असणार आहे. सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत 'एरिया डॉमिनन्स पेट्रोलिंग' सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात आता पोलीसांची नजर राहणार आहे. यामध्ये शहरातील सर्व प्रभारी अधिकारी आपल्या दुय्यम अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सहभागी राहणार आहेत.

हेही वाचा-अँटिलिया कार स्फोटक प्रकरण : सोशल क्लबचा दोन महिन्यांचा डीव्हीआर 'एनआयए'कडून जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details