महाराष्ट्र

maharashtra

जमावबंदीच्या नियमाचे उल्लंघन, शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्याविरोधात तक्रार

By

Published : Apr 6, 2020, 8:07 AM IST

Updated : Apr 6, 2020, 10:38 AM IST

शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या शिर्डीतील रामनवमी उत्सव यावेळी कोरोनामुळे भाविकांवीना साजरा केला गेला. मात्र, या उत्सवात जास्त लोकांना गोळा करु नये, असे शासनाचे आदेश असतानाही जास्त लोकांना गोळा करून फोटोसेशन केले गेले.

शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्याविरोधात तक्रार
शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्याविरोधात तक्रार

अहमदनगर- शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या शिर्डीतील रामनवमी उत्सव यावेळी कोरोनामुळे भाविकांवीना साजरा केला गेला. मात्र, या उत्सवात जास्त लोकांना गोळा करु नये, असे शासनाचे आदेश असतानाही जास्त लोकांना गोळा करून फोटोसेशन केले गेले. तक्रारदार यांच्या अर्जावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे सदर प्रकरणी माहिती मागवण्यात आली असल्याचे शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी सांगितले.

कोरोनाचे संकट उभे राहिल्याने शासनाने देशात संचारबंदी लागू केली आहे. असे असताना मंदिरात दैनंदिन पूजा करण्यासाठी मुभा दिली आहे. याव्यतिरिक्त उत्सव साजरा करण्यास मनाई होती. परंतु, शिर्डी साईबाबा संस्थानच्यावतीने रामनवमी उत्सवाच्या पूर्वसंध्येला पारंपरिक पूजाअर्चा करुन जास्त लोकांना गोळा केल्याचे समोर आले आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंग न पाळता फोटोसेशन करून व्हायरल केल्याची तक्रार नगरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे ईमेलद्वारे केली गेली होती. त्यानंतर आता साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडून सदरील प्रकरणी माहिती मागवली असल्याचे सहा पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी सांगितले.

दिपक गंधाले, पोलीस निरीक्षक शिर्डी

शासनाने कोरोनाच्या अनुषंगाने देशभरात कठोर पाऊले उचलली आहेत. विनाकारण बाहेर पडणाऱ्या अनेकांवर कारवाई केली आहे. त्यातच आता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाचे आदेश धुडकावून लावल्याने काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Apr 6, 2020, 10:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details