महाराष्ट्र

maharashtra

जागतिक परिचारिका दिनीच आंदोलनाचा पवित्रा; १० कंत्राटी आरोग्य सेवक ताब्यात

By

Published : May 12, 2021, 1:20 PM IST

Updated : May 12, 2021, 1:36 PM IST

साईबाबा संस्थानाकडून सध्य स्थितीत कोरोनाग्रस्तांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात संस्थानाच्या दोन्ही रुग्णालयात कंत्राटी आणि संस्थानाकडून कंत्राटी म्हणून नेमलेले एकूण १९० परिचारक आणि परिचारिका आरोग्य सेवेचे काम करत आहेत. मात्र या कामगारांना संस्थानकडून देण्यात येणाऱ्या सुविधा आणि वेतन तटपुंजे असल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

जागतिक परिचारिका दिनीच आंदोलनाचा पवित्रा
जागतिक परिचारिका दिनीच आंदोलनाचा पवित्रा

शिर्डी- साईबाबा संस्थानाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या साईनाथ आणि साईबाबा रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांनी आज जागतिक परिचारिका दिनीच आंदोलनाचे हत्यार उपसले. सुमारे 190 कामगारांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान 45 हजार रुपये वेतनश्रेणी द्यावे. तसेच समान काम समान वेतन मिळावे, ही मागणी करत त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. याप्रकरणी १० रुग्ण सेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जागतिक परिचारिका दिनीच आंदोलनाचा पवित्रा
साईबाबा संस्थानाकडून सध्य स्थितीत कोरोनाग्रस्तांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात संस्थानाच्या दोन्ही रुग्णालयात कंत्राटी आणि संस्थानाकडून कंत्राटी म्हणून नेमलेले एकूण १९० परिचारक आणि परिचारिका आरोग्य सेवेचे काम करत आहेत. मात्र या कामगारांना संस्थानकडून देण्यात येणाऱ्या सुविधा आणि वेतन तटपुंजे असल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कर्मचाऱ्यांनी कायम कामगारांप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे, तसेच परिवाराला विमा संरक्षण, महिन्यातून चार सुट्ट्या पगारी मिळाव्यात अशा मागण्यांचे निवेदन साई संस्थानास दिले होते. मात्र त्या मागण्या मान्य न झाल्याने या कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
परिचारिका दिनीच आंदोलनाचा पवित्रा
गेल्या काही दिवसांपासून हे कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्या संस्थानाकडे मांडत आहेत. मात्र साई संस्थानाचे प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने कर्मचाऱ्यांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगत पोलिसांनी एकूण १० परिचारक आणि परिचारिकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी यावेळी आमच्यावर लाठी चर्चा केला असल्यांचा आरोप या कोरोना योद्ध्यांनी केला आहे. परंतु सध्या कोरोना महामारीचा काळ सुरू आहे, अशा परिस्थिती या कर्मचाऱ्यांनी कायद्याचा भंग केल्याने या आंदोलक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, कोणावरही लाठी हल्ला केला नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
Last Updated :May 12, 2021, 1:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details