महाराष्ट्र

maharashtra

Sri Shirdi Sai Baba Mandir : तीन दिवसात साईचरणी सात कोटींचे दान; मागील वर्षाच्या तुलनेत तीन कोटींची वाढ

By

Published : Jul 5, 2023, 5:14 PM IST

सबका मलिक एकचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवात देश- विदेशातून सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीत येत साई समाधीचे दर्शन घेतले. या दरम्यान सुमारे 7 कोटी 3 लाख रुपयांची विक्रमी गुरुदक्षिणा साईंना अर्पण केली आहे.

Sri Shirdi Sai Baba Mandir
साईचरणी सात कोटीची दान

माहिती देताना पी.शिवा शंकर

अहमदनगर (शिर्डी): गुरूपार्णिमा उत्सवात साईभक्तांनी साईबाबांना दिलेल्या दानाची आज मोजणी करण्यात आली. बाबांना गुरू मानत साईचरणी आपली गुरूभक्ती व्यक्त करताना गुरूला गुरूदक्षिणा म्हणून भाविक भरभरून दान दिले आहे. या गुरुपोर्णिमा उत्सवात 2 लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले आहे. या उत्सव काळातील 3 दिवसाच्या दानाची मोजणी करण्यात आली आहे. या तीन दिवसात 7 कोटी 3 लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. देणगीत मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी 3 कोटी रुपयांच्यावर वाढ झाली आहे.



इतकी मिळालीदेणगी : गरुपौर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसात 7 कोटी 3 लाख 57 हजार 248 एकूण दान प्राप्‍त झाली आहे. यामध्‍ये रोख स्‍वरुपात रुपये 2 कोटी 85 लाख 46 हजार 882 दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाली आहे. देणगी काऊंटर 1 कोटी 15 लाख 84 हजार 150 रुपये, साई प्रसादालय देणगी 2 लाख 84 हजार 946, व्ही व्ही आय पी सशुल्‍क पास देणगी 67 लाख 33 हजार 800, डेबीट क्रेडीट कार्ड 56 लाख 83 हजार 133, ऑनलाईन देणगी 64 लाख 5 हजार 78, चेक डी.डी.देणगी 80 लाख 74 हजार 820 मनी ऑर्डर 2 लाख 9 हजार 5 रुपय, सोने 472,300 ग्रॅम रक्‍कम रुपये 25 लाख 72 हजार 297 व चांदी 4. 679 ग्रॅम रक्‍कम रुपये 2 लाख, 66 हजार रुपयांची प्राप्त झाली आहे.



मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप : गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत साधारणता 2 लाखहून अधिक साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्‍सव कालावधीमध्‍ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे 1 लाख 54 हजार 946 साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर दर्शन रांगेत 1 लाख 88 हजार 200 साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले. या कालावधीत 37 लाख 85 हजार 800 रूपये सशुल्‍क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्‍या माध्‍यमातून प्राप्‍त झाले. उत्‍सव काळात हजारो साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या साईप्रसाद निवासस्‍थान, साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, व्‍दारावती निवासस्‍थान, साईआश्रम भक्‍तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेकरीता उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला. तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्‍या पालख्‍यांमधील पदयात्री साईभक्‍तांनी निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला.



दान करण्याचे प्रमाण वाढले : शिर्डीच्या साईबाबांना भक्तांनकडून दान करण्याचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या काही वर्षात साईबाबा संस्थानच्या दान पेटीत भक्तांनी भरभरुन दान केल्याने साईबाबांच्या गंगाजळतही घसघशीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सन 1920 साली सुरु झालेल्या साईबाबा संस्थानच्या खातामध्ये 1600 रुपय होते. तर आज साई संस्थानची विविध बँकामध्ये पिक्स डिपॉझिट 2200 कोटींची आहे. तसेच साई संस्थानकडे आज 500 किलो सोने आणि 6000 किलो चांदी जमा आहे. ही सगळी त्या भक्तांची देण आहे, जे आपल्या साईना सगळ काही मानतात.

हेही वाचा -

  1. Guru Purnima In Shirdi शिर्डी साईमंदिरात दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  2. Ashadhi Ekadashi 2023 : शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी एकादशीनिमित्ताने शिर्डीत भाविकांची गर्दी
  3. Guru Purnima in Shirdi गुरुपौर्णिमेच्या शुभमुहर्तावर अमेरिकेतील टेक्सास येथील साईभक्ताने केला साईचरणी 20 लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण

ABOUT THE AUTHOR

...view details