महाराष्ट्र

maharashtra

Saibaba Prasadalaya Shirdi: साईबाबा प्रसादलयात भाविकांना आमरसाची मेजवानी

By

Published : Jun 13, 2023, 12:13 PM IST

साईबाबा प्रसादालयात रोज भाविकांना जेवन दिले जाते. सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे, म्हणून भाविकांना साईबाबा प्रसादालयात आज भाविकांना जेवणात आमरस दिला जात आहे. भाविकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे.

Saibaba Prasadalaya Shirdi
साईबाबा प्रसादालयात भाविकांना जेवनात आमरस

साईबाबा प्रसादालयात भाविकांना जेवनात आमरस

अहमदनगर :साईभक्त साईचरणी दान म्हणून शेतमालापासुन हिरे, माणिक, मोती अर्पण करतात. साई भक्तांच्या दानातुन साई प्रसादालयात मोफत भोजन अर्थातच साईचा प्रसाद दिला जातो. सध्या सर्वत्र आमरस पुरीचा बेत आखला जात आहे. साईभक्तांनाही आमरस पुरीचे जेवन द्यावे, या हेतुने साई संस्थानच्या प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात येत आहे. शिरूर येथील भाविक दीपक नारायण सरगळ यांच्या देणगीतून भाविक आमरसाचा स्वाद घेत आहे.


आंबे साई चरणी दान :शिर्डीत प्रत्येक भक्त साई दर्शनासाठी आल्यानंतर आपल्याकुवती प्रमाणे दान करत असतो. सुगीच्या हंगामात शेतकरी आपल्या शेतीत निघालेल्या धान्यापैकी काही धान्य दान करतात. तर, काही शेतकरी भाजीपाला दान करतात. या व्यतिरीक्त साईभक्त पैसे, सोने, चांदी, हिरे, मोतीही दान करतात. मात्र आज साईभक्त असलेले पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील दिपक सरगळ हे आंबा बागदार शेतकरी आहे. त्यांनी साईचरणी दोन लाख रुपये किमतीचे पंचवीस किलो केशर आंबे अर्पण केले आहेत. साईभक्त दिपक हे सन 2019 पासुन आपल्या बागेतील आंबे साई चरणी दान करतात.



भाविकांना आमरसाचे भोजन : दिपक सरगळ यांनी दान केलेल्या या आब्यांचा रस काढण्याचे काम साई प्रसादालयात सकाळ पासुनच सुरु करण्यात आले होते. साई संस्थानमार्फत साईभक्तांच्या देणगीतुन साई प्रसादालयात भक्तांना मोफत जेवन दिले जाते. हे प्रसादालय सकाळी दहा ते रात्री दहा अखंड चालु असते. संस्थान भोजनालयात दररोज किमान चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. आज साई प्रसादलायात येणाऱ्या सगळ्या भाविकांना आमरसाचे भोजन देण्यात आले आहे.


हेही वाचा :

  1. Sai Baba Temple Shirdi : साईबाबांचे व्‍दारकामाई मंदिर पुर्वीप्रमाणे खुले; भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव
  2. Shirdi Sai Temple : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन
  3. Shirdi Sai Baba : दोन हजार रुपये नोटबंदीनंतर साई संस्थान अलर्ट; भाविकांना केले 'हे' आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details