महाराष्ट्र

maharashtra

Sai Baba Death Anniversary 2023 : साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 4:40 PM IST

Sai Baba Death Anniversary 2023: शिर्डीत साईबाबांच्या 105 व्या पुण्यतिथी उत्सवास आज साई मंदिरात पहाटे काकड आरतीनंतर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. (Saibaba procession) या वर्षी शिर्डीत चार दिवस साईबाबांचा (Saibaba) पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे. (Shirdi) आज उत्सवाच्या पहिल्या दिवशी साई मंदिरातून श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. (Saibaba death anniversary)

Sai Baba Death Anniversary 2023
पुण्यतिथी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात

साईबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने शिर्डीत भाविकांची गर्दी

शिर्डी (अहमदनगर) Sai Baba Death Anniversary 2023: यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी वीणा आणि प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे व खरेदी विभागाचे प्र.अधिक्षक अविनाश कुलकर्णी यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला होता. ही मिरवणूक द्वारकामाईत पोहचल्यानंतर तेथे साईसच्‍चरित्र या ग्रंथाच्‍या अखंड पारायणास सुरुवात झाली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले.

साईबाबांच्या मिरवणूक सोहळ्यात सहभागी भाविक

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा: श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्‍या हस्‍ते श्रींची पाद्यपूजा करण्‍यात आली. यावेळी प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, संरक्षण अधिकारी आणासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे व खरेदी विभागाचे अधिक्षक अविनाश कुलकर्णी उपस्थित होते.

मंदिराला आकर्षक सजावट:साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. मुंबई येथील द्वारकामाई मंडळाने साकारलेला पन्नास फुट राम मंदिराचा देखावा भाविकांचं मुख्य आकर्षण ठरत असून हजारो भाविक विजयादशमी अर्थात पुण्यतिथी उत्सवात साईदर्शनासाठी गर्दी करताहेत. उत्सवाच्या‌ सांगता दिनी 26 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील साईचरणी लीन होणार आहेत. साई मंदिराच्या नवीन दर्शन कॉम्पलेक्स उद्घा‌टन मोदींच्या हस्ते होणार असल्याने शिर्डीत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

'हे' आहे पुण्यतिथीचे महत्त्व:साईबाबांनी १०३ वर्षांपूर्वी दसऱ्याच्‍या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. त्‍यानंतर आजतागायत हा पुण्‍यतिथी उत्सव नव्‍या उत्‍साहात साजरा केला जात आहे. ज्‍यामुळे विजयादशमी म्‍हणजे साईबाबांची पुण्‍यतिथी, अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्‍त हा उत्‍सव साजरा करतात. शिर्डी येथे या पुण्यतिथी उत्‍सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येते.

साईबाबांच्या 42 अध्यायात बाबांच्या महानिर्वाणाचे महत्त्व: श्री साईसच्‍चरिताच्‍या ४२ व्‍या अध्‍यायात बाबांच्‍या महानिर्वाणाचे वर्णन करण्‍यात आले आहे. हेमाडपंत म्‍हणतात, बाबांचे एक भक्‍त रामचंद्र पाटील कोते एकदा अतिशय आजारी पडले. जीवावरचे संकट त्‍यांना सोसवत नव्‍हते. कोणताच उपाय बाकी राहिला नव्‍हता. जीव अगदी नकोसा होऊन गेला. अशा अवस्‍थेत एका मध्‍यरात्री बाबांची मूर्ती एकाएकी रामचंद्र पाटलांच्‍या उशापाशी प्रकटली.

हेही वाचा:

  1. Sai Baba Death Anniversary: साईबाबांच्या चार दिवशीय पुण्यतिथी उत्सवाची साई संस्थानकडून जय्यत तयारी
  2. Sai Baba Mahanirvan : जगाला एकतेचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या महानिर्वाणास तारखेनुसार 105 वर्ष पूर्ण; जाणून घ्या इतिहास
  3. साईबाबांचा पुण्‍यतिथी उत्‍सव भक्तीमय वातावरणात संपन्न

ABOUT THE AUTHOR

...view details