महाराष्ट्र

maharashtra

MLA Dr K Kampu Raju : वाद करण्यापेक्षा आपण सर्व आधी भारतीय आहोत हे लक्षात ठेवा - डॉ के. कम्पू राजु

By

Published : Dec 8, 2022, 4:16 PM IST

कर्नाटक राज्यातील गौरी बिदनुर चे अपक्ष आमदार डॉ के. कम्पू राजु (MLA Dr K Kampu Raju) यांनी, 'आपण सर्व पहिले भारतीय असल्याचं सर्वांनी ध्यानात (made positive statement) ठेवावे,' असे म्हणटले. शिर्डी दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद प्रकरणी (Maharashtra and Karnataka border issue) ते पत्रकारांशी बोलत होते.

MLA Dr K Kampu Raju
डॉ के. कम्पू राजु

अहमदनगर : कर्नाटक राज्यातील गौरी बिदनुर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार डॉ के कम्पू राजु (MLA Dr K Kampu Raju) यांनी आपल्या मतदारसंघातील 535 गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना, बेंगळुरू येथुन थेट विमानाने मुबंईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभुमी येथे दर्शनासाठी घेऊन आले आहे. सहा डिसेंबरला भारत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निम्मीताने या सर्वांनी चैत्यभुमीवर जावुन अभिवादन केले. त्यानंतर आमदार राजु सर्वांना बसने घेऊन शिर्डीला पोहचले. सकाळीच या 535 लोकांनी साई मंदीरात जावुन, साई समाधीचे दर्शन घेतले.

प्रतिक्रिया देतांना डॉ के. कम्पू राजु




दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरू (Maharashtra and Karnataka border issue) असल्याने यावर बोलतांना (made positive statement) राजु म्हणाले की , सीमाप्रश्ना वरुन वाद करून काही मिळणार नाही. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश यांनी सीमे वरून वाद करायला नको, देशात हिंदू मुस्लिम वाद देखील व्हायला नको, जाती- धर्मा पेक्षा आपण सर्व पहिले भारतीय असल्याचं सर्वांनी ध्यानात ठेवावे, असे यावेळी कर्नाटकचे अपक्ष आमदार राजु शिर्डी दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details