महाराष्ट्र

maharashtra

शिर्डी : सीएनजी गॅस संपल्याने पंपासमोर पहाटेपासनच वाहनांच्या लांबच लांब रांगा..

By

Published : Nov 7, 2021, 4:38 PM IST

Updated : Nov 7, 2021, 4:53 PM IST

दिपावलीच्या सुट्टयांमुळे शिर्डीत आज साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना परतीच्या प्रवासातही मनस्ताप सहन करावा लागतोय. शिर्डी परिसरात एकच सीएनजी पंप आहे आणि त्यातच सीएनजी गॅस संपल्याने पहाटेपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा पंपासमोर लागल्या आहेत.

cng shortage
cng shortage

शिर्डी (अहमदनगर) -दिपावलीच्या सुट्टयांमुळे शिर्डीत आज साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना परतीच्या प्रवासातही मनस्ताप सहन करावा लागतोय. शिर्डी परिसरात एकच सीएनजी पंप आहे आणि त्यातच सीएनजी गॅस संपल्याने पहाटेपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा पंपासमोर लागल्या आहेत.


शिर्डी शहराजवळील सावळीविहिर येथे एकमेव सीएनजी पंप आहे. त्यानंतर नासिक किंवा पुणे जिल्हयातील आळेफाटा येथे सीएनजी पंप आहेत. शिर्डीला दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणाऱ्या भाविकांना आणि वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. पेट्रोलचे दर सीएनजी पेक्षा जास्त असल्याने सीएनजीसाठी पंपासमोर एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रवासाचे बजेट कोलमडत असल्याने भाविक तासनतास सीएनजीसाठी थांबून आहेत.

सीएनजी गॅस संपल्याने पंपासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा
सीएनजीचा पुरवठा पुणे जिल्हयातील न्हावरा फाटा येथून होत असल्याने आणि पुरवठ्यात अडचणी निर्माण होत असल्याने सिएनजीचा तुटवडा असल्याचे पंपचालक जपे यांनी सांगितलंय. तसेच कालपासूनच पंपाबाहेर सीएनजी शिल्लक नाही, असा फलकही लावण्यात आला असून आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत सीएनजी पंपावर उपलब्ध होणार असल्याच्या सूचना सर्व ग्राहकांना देण्यात आल्या असल्याचे पंपचालक जगदीश जपे यांनी सांगितले आहे.सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असल्याने अनेक कारचालकांनी आपल्या गाड्या सीएनजी केल्या आहेत. सीएनजीचे दरही कमी आहेत आणि गाडी मायलेजही चांगली देत असल्याचे गाडी चालकांनी सांगितले आहे.
Last Updated : Nov 7, 2021, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details