महाराष्ट्र

maharashtra

Sai Baba Temple Shirdi : साईबाबांचे व्‍दारकामाई मंदिर पुर्वीप्रमाणे खुले; भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव

By

Published : Jun 3, 2023, 7:15 AM IST

शिर्डीतील साई बाबा मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यानंतर साई बाबांची द्वारकामाई मंदिर पूर्वीप्रमाणेच रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय तदर्थ समितीने घेतला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आहे.

Shirdi Saibaba Dwarkamai temple
व्‍दारकामाई मंदिर

शिर्डी :साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. साई बाबांचे व्‍दारकामाई मंदिर पुर्वीप्रमाणे रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्याचा महत्वाचा निर्णय साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने घेतल्याची माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. साई बाबांचे द्वारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.



व्‍दारकामाई मंदिर पूर्वीप्रमाणे रात्रभर खुले :कोरोना काळात संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सर्वच धार्मिक तीर्थक्षेत्र बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव जसा जसा कमी होत गेला, तसे निर्बंधही शिथिल होते गेले. पुन्हा इतर मंदिरांप्रमाणे साई मंदिराचे दरवाजे देखील भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. मात्र साई बाबांचे व्‍दारकामाई मंदिर साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी दिवसभर खुले आणि रात्रभर बंद ठेवण्यात येत होते. यामुळे अनेक भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी साई बाबांची द्वारकामाई मंदिर पूर्वीप्रमाणे रात्रभर खुले करण्याची मागणी साई संस्थानकडे केली होती. भाविक आणि शिर्डी ग्रामस्थांच्या या मागणीकडे पाहाता साई संस्थांच्या तदर्थ समितीने आजपासून पूर्वीप्रमाणे व्‍दारकामाई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे.


भाविकांनी मानले संस्थानचे आभार :साईबाबांच्या समाधीच्‍या दर्शननंतर भाविक व्‍दारकामाई, चावडी व गुरुस्‍थान आदी ठिकाणी प्राधान्‍याने दर्शनासाठी जातात. शिर्डी ग्रामस्थ साई बाबांच्या समाधी मंदिरात दर्शनाला जाण्या अगोदर द्वारकामाईचे दर्शन घेतात. त्याचबरोबर साई बाबांच्या मंदिरात होणाऱ्या चारही आरती काही भाविक व्‍दारकामाईत बसून करतात. साईबाबा संस्थानने आजपासून पूर्वीप्रमाणे व्‍दारकामाई मंदिर खुले केल्याने भाविकांसह ग्रामस्थांनी साई संस्थानचे आभार मानले आहेत.


द्वारकामाईचे महत्व :साई बाबांनी संपूर्ण जीवन याच व्‍दारकामाईत व्‍यतीत करुन जगाला सबका मालिक एकचा महामंत्र दिला. त्याचबरोबर साईबाबांनी अनेक भाविकांना अन्‍नदान, रुग्‍ण सेवा, ज्ञानदान या त्रिसुत्रीची शिकवण दिली. या व्‍दारकामाईत साईबाबांनी धुनी पेटवली आहे. त्‍यामुळे व्‍दारकामाईस अनन्‍य साधारण महत्‍व आहे. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेला प्रत्येक भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनानंतर साईबाबांच्या व्‍दारकामाईत दर्शनासाठी जात असतो.


पूर्वीप्रमाणे व्‍दारकामाई खुले :व्‍दारकामाई मंदिर पूर्वीप्रमाणे खुले करण्यात आले आहे. पहाटे 5 ते रात्री 9.30 यावेळेत व्‍दारकामाईतील गाभारा दर्शन सुरु राहणार असून व्‍दारकामाई सभामंडप साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर खुला ठेवण्‍यात येणार आहे. भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहनही साईबाबा संस्‍थानचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा -

  1. Amol Mitkari : 'शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दंगली...'
  2. Nirjala Ekadashi 2023 : निर्जला एकादशी कधी असते? भीमाने का ठेवले एवढेच व्रत? मुहूर्त, पारण आणि महत्त्व जाणून घ्या
  3. Vrat and festival list june 2023 : जून महिन्यात पाळले जातील हे उपवास आणि सण, येथे पहा यादी

ABOUT THE AUTHOR

...view details