महाराष्ट्र

maharashtra

अवकाळी पावसाने अकोले तालुक्यात भात शेतीचे मोठे नुकसान

By

Published : Nov 26, 2021, 10:09 AM IST

भात शेतीचे मोठे नुकसान
भात शेतीचे मोठे नुकसान ()

शेतकऱ्यांनी तयार केलेली खळे पाण्यात डुंबून गेले आहेत. शेतकऱ्यांना मध्ये नैराश्याचे वातावरण असून यातून बाहेर येण्यासाठी गरीब शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून गावोगावी नुकसानीची पाहणी व नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

अहमदनगर- अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील भात शेतीचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने अवकृपा केल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे.

अवकाळी पावसाने अकोले तालुक्यात भात शेतीचे मोठे नुकसान

अकोले तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकांची डोळ्या देखत झालेली बर्बादी बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू तरळले होते. हाती आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी हिरमुसला आहे. भात हे या भागातील मुख्य पीक असल्याने या पिकाकडे शेतकरी विशेष लक्ष देऊन उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात. मेहनत करून हातातोंडाशी आलेला घास अशाप्रकारे हिरावून घेतल्यानंतर गावोगावी निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. चालू हंगामात पावसाने मोठी दडी मारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भात लागवड उशिरा झाल्याने यंदा हंगाम संपण्यास उशीर लागत होता. उशिरा येणारे भात वानांची कापणी अद्यापही सुरू होती. सुमारे पन्नास टक्के क्षेत्रावरील भात कापणी अद्यापही बाकी होती. या सर्वांवर अवकाळी पावसाने पाणी फिरवल्याने अक्षरशः कापणी केलेले भात पाण्यात तरंगत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भात शेतीचे मोठे नुकसान

शेतकऱ्यांनी तयार केलेली खळे पाण्यात डुंबून गेले आहेत. शेतकऱ्यांना मध्ये नैराश्याचे वातावरण असून यातून बाहेर येण्यासाठी गरीब शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून गावोगावी नुकसानीची पाहणी व नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अकोले तालुक्यातील खिरविरे, एकदरे, जाईनावाडी, पिंपळदरावाडी, कोकणवाडी, बिताका, शिवाजीनगर, तिरडे, पाचपट्टा, शिवाजीनगर, देवगाव, लाडगाव, टिटवी, वाकी, चिचोंडी, वारंघुशी, बारी, जहागीरदारवाडी यासह आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details