महाराष्ट्र

maharashtra

सलग सुट्ट्यांमुळं साईबाबांची शिर्डी भक्तांनी गेली फुलून; मंदिर रात्रभर राहणार खुले

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 5:42 PM IST

Crowd In Shirdi Saibaba : साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. नाताळाच्या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे लाखो भाविक शनिवारपासूनच शिर्डीत दाखल झाले आहेत. (Sai Baba Shirdi) भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी साईबाबा संस्थान सज्ज झाले आहे. (Christmas Holidays) रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत जवळपास एक लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं असल्याची माहिती साईबाबा संस्थानकडून देण्यात आलीय.

Devote Crowd In Shirdi
शिर्डीत भाविकांची गर्दी

भाविकांची शिर्डीत गर्दी

शिर्डी (अहमदनगर) Crowd In Shirdi Saibaba : नाताळाच्या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविकांनी शनिवारी (23 डिसेंबर) पासूनच साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठी गर्दी केलीय. रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून साईबाबांचे मुख्य दर्शन, कळसाचे दर्शन तसेच साई समाधीचे दर्शन (Sai Mandir Shirdi) अशा विविध मार्गाने दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल एक लाख भाविकांनी दर्शन घेतलंय.

समाधी दर्शनासाठी तीन ते चार तास : साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी भाविकांना जवळपास तीन ते चार तास लागत आहेत. साईबाबा संस्थानच्या विविध सुरक्षा एजन्सी या साईबाबा मंदिर, दर्शन लाईन, मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतायेत. त्याचबरोबर मंदिराबाहेरील सुरक्षा शिर्डी पोलीस पाहतायेत. (Sai Sansthan Shirdi)

सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत गर्दी वाढली : शिर्डीत आलेल्या भाविकांच्या दर्शनाची, भोजनाची आणि निवासाची व्यवस्था संस्थानच्या वतीनं करण्यात येत आहे. एकंदरीत सुट्टीमुळे शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली असून, नवीन वर्षापर्यंत भाविकांची गर्दी शिर्डीत अशीच राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिलीय.

साई मंदिर रात्रभर खुलं राहणार : नाताळाच्या सुट्ट्या, नवीन वर्षांचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दरवर्षी भाविकांची शिर्डीत मोठी गर्दी होत असते. भाविकांना साईबाबांच्या समाधीचे दर्शन मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 31 डिसेंबर रोजी साईबाबांचे समाधी मंदिर रात्री खुलं ठेवण्यात येणार असल्याचंही साईबाबा संस्थानच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

शिवराज सिंह चौहान लावतात हजेरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील लाखो भाविक शिर्डीत दाखल होत असतात, याच बरोबरीने राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरही साईबाबांच्या दर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतात. दरवर्षी मध्यप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान न चुकता दरवर्षी 31 डिसेंबर रोजी शिर्डीतील शासकीय विश्रामगृह येथून पायी चालत येत साईबाबांच्या मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतात. ते 1 जानेवारी रोजीच्या साईबाबांच्या काकड आरतीला हजेरीही लावतात. मध्यप्रदेशसह देशातील जनतेला नवीन वर्ष सुखाचे आणि समृद्धीचे जावे यासाठीही साईंचरणी चौहान प्रार्थना करतात.

हेही वाचा:

  1. विकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी; 'या' वाहनांना महामार्गावर प्रवेश नाही
  2. कुस्तीपटूंच्या विरोधानंतर क्रीडा मंत्रालयाला जाग; भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द
  3. मागील 25 वर्षात तुम्ही फक्त मुंबईला लुटलं; शिवसेना नेत्यांचं आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

ABOUT THE AUTHOR

...view details