महाराष्ट्र

maharashtra

Balasaheb Thorat On India : 'इंडिया'चा भाजपानं घेतला धसका, सत्ता जाण्याच्या भीतीनं भाजपाचं कारस्थान- थोरात

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 11:04 PM IST

भाजपानं इंडिया शब्दाचा धसका घेतल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केलीय. ते आज भारत जोडो योत्रेच्या वर्षापूर्तीनिमित्त संगमनेरमध्ये बोलत होते.

Balasaheb Thorat On India
Balasaheb Thorat On India

बाळासाहेब थोरात यांची पत्रकार परिषद

शिर्डी : इंडिया तसंच भारत या दोन्ही शब्दांबद्दल आम्हाला प्रेम आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत इंडिया या नावानं आघाडी तयार केली आहे. मात्र केंद्रातील भाजपा सरकारनं देशाचं नाव इंडियाऐवजी भारत केलं. भाजपानं इंडिया शब्दाचा एवढा धसका का घेतला असा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत आपली सत्ता जाणार या भीतीनं भाजपाने सरकार वाचवण्यासाठी नवनवीन प्रयोग सुरू आहे. इंडिया आघाडीमुळं पायाखालची वाळू सरकच असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केलीय.


सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही : भारत जोडो यात्रेच्या वर्षापूर्तीनिमित्त संगमनेर येथील यशोधन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना थोरात म्हणाले की, आजवर आपण अनेक दुष्काळांना तोंड दिलं. पण इतका भीषण दुष्काळ आजवर कधीच पडला नव्हता. खरिपाची पीकं वाया गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळं राज्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारनं दुष्काळावर उपाय योजना करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेणे आवश्यक आहे. मात्र, राज्यातील महायुती सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

मराठा आरक्षणाला पाठिंबा :मराठा समाज हा संयमी समाज असून या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, या सरकारनं गेल्या वर्षभरात मराठा समाजाकडं दुर्लक्ष केलं. त्यांनी वर्षभर एकही बैठक घेतली नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ५० टक्क्यांच्यावर आरक्षण देण्यास हरकत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. या मागणीत आम्ही कोणत्याही प्रकारचं खत पाणी घालनार नाही. मात्र, सध्याचं महायुती सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगळा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.



सध्या केंद्रातील भाजपा सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहे. या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं कन्याकुमारी ते श्रीनगर असं साडेतीन हजार किमीचं अंतर कापून भारत जोडो यात्रा काढण्यात आली. यात्रेत देशातील वाढती बेरोजगारी, महागाई या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या पदयात्रेला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचं नियोजन सर्वोत्कृष्ट ठरले, विदर्भातील शेगावची सभा देशभर चर्चेत आली. महागाईनं देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांचं जगणं कठीण झाले आहे. जनतेला जागृत करण्यासाठी काँग्रेसनं लढा हाती घेतल्याचं काम केलं असं थोरात म्हणाले.

हेही वाचा -

  1. Nana Patole Jan Samvad Yatra : ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावून राज्याला...नाना पटोलेंचा गंभीर आरोप
  2. Ajit Pawar in Kolhapur: कोल्हापुरात शरद पवारांनंतर अजित पवार सभा घेऊन करणार शक्तीप्रदर्शन
  3. Maratha Reservation: मराठवाड्यातील कुणबी दस्तावेज तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर, 48 तासांमध्ये तपशील कळवण्याचे निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details