महाराष्ट्र

maharashtra

Brother Sister Drowned : संगमनेरमध्ये शेततळ्यात बुडून बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू

By

Published : May 8, 2022, 6:06 PM IST

संगमनेर तालुक्यातील मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे शेततळ्यात बुडून सख्या बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू ( Brother Sister Drowned ) झाला आहे. ही घटना रविवार ८ मे रोजी सकाळी घडली आहे.

Brother Sister Drowned
Brother Sister Drowned

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे शेततळ्यात बुडून सख्या बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू ( Brother Sister Drowned ) झाला आहे. ही घटना रविवार ८ मे रोजी सकाळी घडली आहे. या दुर्दैवी घटनेने मोधळवाडी गावात शोककळा पसरली आहे. जयश्री बबन शिंदे वय ( वर्षै २१) व आयुष बबन शिंदे वय ( ७) असे बहीण- भावाचे नाव आहे.

बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू
संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहात आहे. रविवारी सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण- भाऊ धुणे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने शेततळ्यात उडी मारली. मात्र, दोघेही शेततळ्यातील पाण्यात बुडाले.

गावावर शोककळा
जयश्री व आयुष हे दोघे बहीण - भाऊ शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. पण त्या अगोदरच बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतद्ह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात नेण्यात आले आहे. तर बहीण- भावाच्या दुर्दैवी मृत्यूने पिंपळगाव देपा गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे. जयश्री व आयुष या दोघा बहीण- भावाचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता.

हेही वाचा -Inter Caste Marriage Case Amravati :...अखेर 'ती' युवती पतीच्या घरी परतली; आई-वडिलांविरोधातील तक्रार घेतली मागे

ABOUT THE AUTHOR

...view details