महाराष्ट्र

maharashtra

Public Toilets Demolished : मनपाने बांधलेले 18 शौचालय अज्ञातांनी केले जमीनदोस्त; परिसरात चर्चेला उधाण

By

Published : Dec 5, 2021, 8:49 PM IST

पाडलेली शौचालय
पाडलेली शौचालय ()

24 पैकी 18 सार्वजनिक शौचालये रात्रीतून ( 18 Public Toilets Demolished ) अज्ञात महाभागाने जमिनदोस्त केले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात मोठ्या चर्चेला उधाण आले असून हा उद्योग नेमका कोणी आणि कोणत्या हेतून केला ? यावर चर्चा रंगली आहे. जागा बळकवण्याच्या उद्देशातून हा प्रकार झाला असावा, अशी मोठी चर्चा असून मनपा आयुक्त ( Municipal Commissioner ) यावर काय भूमिका घेतात. प्रभागातल्या नगरसेवकांची यावर काय भूमिका असणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

अहमदनगर - शहरातील झारेकर गल्लीतील मनपाचे ( Municipal Corporation ) 24 पैकी 18 सार्वजनिक शौचालये रात्रीतून ( 18 Public Toilets Demolished ) अज्ञात महाभागाने जमिनदोस्त केले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात मोठ्या चर्चेला उधाण आले असून हा उद्योग नेमका कोणी आणि कोणत्या हेतून केला ? यावर चर्चा रंगली आहे. जागा बळकवण्याच्या उद्देशातून हा प्रकार झाला असावा, अशी मोठी चर्चा असून मनपा आयुक्त ( Municipal Commissioner ) यावर काय भूमिका घेतात. प्रभागातल्या नगरसेवकांची यावर काय भूमिका असणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

  • वापरातील शौचालय पाडल्याने नागरिकांची कुचंबणा

हे सार्वजनिक शौचालय परिसरातील नागरिक वापरत होते. चोवीस पैकी अठरा शौचालय अज्ञातांनी पाडले असून महानगरपालिकेने गुन्हा दाखल करून तातडीने नव्याने नवीन शौचालय बांधून द्यावेत, अशी मागणी करणार असल्याचे प्रभागातल्या भाजपा नगरसेविका सोनाली अजय चितळे यांनी सांगितले आहे. महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. तसेच पाडलेली शौचालये लवकरच पुन्हा बांधली जातील, असे सांगितले आहे.

हेही वाचा -Omicron In Maharashtra : शारजाहवरून आलेल्या 95 प्रवाशांची नागपूर विमानतळावर कोरोना चाचणी

ABOUT THE AUTHOR

...view details