महाराष्ट्र

maharashtra

Tokyo Olympics Day 10 : 41 वर्षानंतर भारतीय हॉकी संघ उपांत्यफेरीत पोहचणार? पी.व्ही. सिंधु 'कांस्य'साठी खेळणार

By

Published : Jul 31, 2021, 10:11 PM IST

tokyo-olympics-day-10
tokyo-olympics-day-10 ()

ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी देशवासियांची नजर पीव्ही सिंधूच्या कांस्य पदकावर असेल. टोकिओ ऑलिम्पिक संपण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. खेळांचा हा महाकुंभ संपण्यास एक आठवड्याचा काळ शिल्लक राहिला आहे. भारतासाठी महत्वपूर्ण सामना पुरुष हॉकी क्वार्टर फायनल असेल. भारतीय हॉकी टीम हा मुकाबला जिंकून 41 वर्षानंतर सेमीफायनलचे तिकीट पक्के करण्याच्या इराद्याने खेळेल.

हैदराबाद -टोकियो ऑलिम्पिकचा 9वा दिवस भारतासाठी चांगला राहिला नाही. बॉक्सिंग आणि बैडमिंटनमध्ये भारताला पराभव सहन करावा लागला. पीव्ही सिंधु फायनलच्या रेसमधून बाहेर पडली आहे. मात्र उद्या सिंधुकडे पदक जिंकण्याची एक संधी आहे.

सिंधु रविवारी कांस्य पदकासाठी मैदानात उतरणार आहे. बॉक्सिंगमध्ये पूजा रानी क्वार्टर फायनलमध्ये पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडली आहे. नेमबाजीतही भारताचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. डिस्कस थ्रो मध्ये कमलप्रीत कौरने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये धडक दिली आहे.

टोकिओ ऑलिम्पिक संपण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. खेळांचा हा महाकुंभ संपण्यास एक आठवड्याचा काळ शिल्लक राहिला आहे. भारतीय खेळाडूंची दावेदारीही हळुहळु संपत चालली आहे. मात्र असूनही पुरुष हॉकी संघाकडून भारताला पदकाची आशा आहे. त्याचबरोबर अथलेटिक्स (Athletics) आणि बॉक्सिंग (Boxing) मध्येही भारतीय खेळाडू चमत्कार करू शकतात. एक ऑगस्ट रोजी सर्वांची नजर महिला बॅडमिंटन सामन्यावर असेल. यात कांस्य पदकाची अजूनही आशा आहे.

टोकियो ऑलिम्पिक 10 वा दिवस

भारतासाठी महत्वपूर्ण सामना पुरुष हॉकी क्वार्टर फायनल असेल. भारतीय हॉकी टीम हा मुकाबला जिंकून 41 वर्षानंतर सेमीफायनलचे तिकीट पक्के करण्याच्या इराद्याने खेळेल. क्वार्टर फायनलमध्ये भारताचा मुकाबला ग्रेट ब्रिटन संघाशी होणार आहे. ब्रिटन आपल्या गटात तिसऱ्या स्थानावर राहिला होता तर भारत आपल्या गटात दुसऱ्या स्थानी होता.

एक ऑगस्ट रोजीचे ऑलिम्पिक वेळापत्रक -

पुरुष हॉकी उप-उपांत्य सामना

कोच ग्राहम रीड आणि कर्णधार मनप्रीत सिंह यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकी टीमने ग्रुप स्टेजमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. साखळी गटात भारतीय संघाचा केवळ ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. त्यानंतर सर्व सामने भारताने जिंकले आहेत. भारतीय संघाकडून अशाचे प्रदर्शनाची आशा देशवासीयांना असेल. भारताने उद्याचा सामना जिंकल्यास भारतीय संघ 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये पोहचेल.

बॉक्सिंगमध्ये सतीशकडून अपेक्षा -

हॉकीशिवाय बॉक्सिंग रिंगमध्येही भारत चमत्कार करु शकतो. भारताचा हेवीवेट बॉक्सर सतीश कुमार आपला पुढचा सामना खेळण्यासाठी रिंगमध्ये उतरेल. सतीशचे हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही तशीच कामगिरीची अपेक्षा सतिशकडून असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details