महाराष्ट्र

maharashtra

Tokyo Olympics: आज दिवसभरातील सामन्यांचे निकाल; जाणून घ्या एका क्लिकवर

By

Published : Jul 28, 2021, 9:02 AM IST

Updated : Jul 28, 2021, 4:29 PM IST

Tokyo Olympics 2020

15:41 July 28

साई प्रणीतचे आव्हान संपुष्टात

बॅडमिंटन - भारताचा पुरूष बॅडमिंटनपटू साई प्रणीत याचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. साई प्रणीतचा मार्क कॅलजॉव याने 21-14, 21-14 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.  

15:16 July 28

दीपिका कुमारी अंतिम 8 मध्ये दाखल

दीपिका कुमारी महिला एकेरीच्या अंतिम 8 मध्ये पोहोचली आहे. तिने राउंड 16 मध्ये अमेरिकेच्या जेनिफरचा 6-4 ने पराभव केला. 

15:00 July 28

पूजा राणी पदकापासून एक पाऊल दूर

महिला बॉक्सर पूजा राणीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरूवात केली. तिने अंतिम 16 च्या सामन्यात अल्जारियाच्या इचराक चेभ हिचा 5-0 ने पराभव केला. ती अंतिम 8 मध्ये पोहोचली आहे. 

14:36 July 28

दीपिका कुमारीकडून पदकाच्या आशा वाढल्या, पोहोचली टॉप 16 मध्ये

तिरंदाजी - दीपिका कुमारीने राउंड 32 मध्ये भूटानच्या कर्मा हिचा पराभव केला. दीपिकाने हा सामना 6-0 ने जिंकला.  

13:45 July 28

प्रविण जाधवचे आव्हान संपुष्टात

तिरंदाजी - प्रविण जाधवचे आव्हान राउंड 16 मध्ये संपुष्टा आले. अमेरिकेच्या एलिसन ब्रेडी याने प्रविणचा 6-0 ने पराभव केला.  

13:05 July 28

प्रविण जाधवचा दमदार विजय

तिरंदाजी - प्रविण जाधवने पुरूष एकेरीच्या फेरीतील सामना 6-0 च्या फरकाने खिशात घातला. त्याचा अंतिम 16 फेरी मधील सामना काही वेळात सुरू होईल. या फेरीत त्याचा सामना अमेरिकेच्या एलिसन ब्रेडी याच्याशी होणार आहे. 

12:07 July 28

गणपती-वरुणची जोडी 18 व्या स्थानावर कायम

सेलिंग - भारताच्या गणपती केलपांडा आणि वरुण ठक्कर चौथ्या रेसमध्ये 19 व्या स्थानावर होते. शर्यतीच्या अखेरीस ते 18 व्या स्थानावर राहिले. एकूण 12 शर्यतीतील 8 रेस झाल्या असून 4 शिल्लक आहेत. ज्यातील दोन रेस उद्या गुरूवारी पार पडणार आहेत.  

09:24 July 28

तिरंदाजी - तरूणदीपचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

तरुणदीप याचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. इज्राइलच्या इटे शैनी याने शूटऑफ राउंडमध्ये तरूणदीपचा पराभव केला.  

09:21 July 28

नौकानयन - भारताने पदक जिंकण्याची संधी गमावली

नौकानयनमध्ये भारताने पदक जिंकण्याची संधी गमावली. अर्जुन लाल आणि अरविंद या पुरूष डबल स्कल्स जोडीचा उपांत्य फेरीत पराभव झाला. ते अखेरच्या स्थानावर राहिले. दरम्यान, या खेळात टॉपचे 6 जोड्या पात्र ठरतात.  

09:16 July 28

बॅडमिंटन - पी. व्ही सिंधूची विजयी घौडदौड

पी. व्ही. सिंधूची ऑलिम्पिकमधील विजयी घौडदौड कायम आहे. आज दुसऱ्या फेरीतील सामन्यात सिंधूने हाँगकाँगच्या यी नांग चुंग हिचा 21-9, 21-16 ने पराभव केला.  

09:15 July 28

तिरंदाजी - तरुणदीप रायचा विजय

तिरंदाज तरूणदीप रायने पुरूष अंतिम 32 गटात युक्रेनच्या हनबिन ओलेक्सीचा 6-4 ने पराभव केला.  

09:09 July 28

भारतीय महिला हॉकी संघाचा आणखी एक पराभव

भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पराभव झाला. ग्रेट ब्रिटनने भारताचा 4-1 ने पराभव केला. भारतीय संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे.  

08:55 July 28

टोकियो ऑलिम्पिक सामन्यांचे अपडेट

टोकियो ऑलिम्पिकचा आज सहावा दिवस आहे. आजच्या दिवशी भारतीय महिला हॉकी संघाचा सामना ग्रेट ब्रिटनशी होणार आहे. याशिवाय तिरंदाज, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, रोइंग, सेलिंग आणि बॉक्सर यांचे आज सामने होणार आहेत. ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर पूजा राणी आज डेब्यू करणार करणार आहे.  

Last Updated :Jul 28, 2021, 4:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details