महाराष्ट्र

maharashtra

US Open Final : रागात तोडलं रॅकेट; पराभव समोर पाहून ओक्साबोक्सी रडू लागला नोवाक जोकोविच

By

Published : Sep 14, 2021, 5:25 PM IST

Updated : Sep 14, 2021, 5:31 PM IST

watch-video-novak-djokovic-breaks-his-racket-in-anger-during-us-open-final-against-daniil-medvedev

यूएस ओपन स्पर्धेचा अंतिम सामना नोवाक जोकोविच आणि डेनिल मेदवेदेव यांच्यात पार पडला. मेदवेदेव याने या सामन्यात जोकोविचचा पराभव केला. या पराभवासह जोकोविचचे कॅलेंडर स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले.

न्यूयॉर्क - यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच याचा पराभव झाला. रशियाच्या डेनिल मेदवेदेव याने त्याचा 6-4, 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केले. या पराभवासह जोकोविचचे कॅलेंडर स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले. जोकोविच सामन्यात अनेकवेळा चिडलेला पाहायला मिळाला.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला डेनिल मेदवेदेव याने सुरूवातीपासून सामन्यावर पकड निर्माण केली होती. यामुळे नोवाक जोकोविच अंडर प्रेशरमध्ये खेळताना दिसला. मेदवेदेव याने आघाडी घेतली तेव्हा जोकोविच फ्रस्ट्रेट झाला. या फ्रस्ट्रेशनमध्ये त्याने आपले रॅकेट तीन वेळा कोर्टवर ताकतीने मारले. त्याने रॅकेट इतक्या जोराने कोर्टवर मारला की रॅकेट पूर्णपणे तुटले.

नोवाक जोकोविचने कधी तोडला रॅकेट?

सामना सुरू होऊन जवळपास दीड झाला होता. यात डेनिल मेदवेदेवची आघाडी कायम होती. नोवाक जोकोविच सतत मेदवेदेवची आघाडीची आघाडी भेदण्याच्या प्रयत्न करत होता. पण त्याचे मनसुबे मेदवेदेव हाणून पाडले. तेव्हा फ्रस्ट्रेट होऊन जोकोविचने रॅकेट कोर्टवर मारत तोडला. यानंतर त्याला वॉर्निंग देण्यात आली.

पराभवानंतर नोवाक जोकोविचच्या डोळ्यात अश्रू

सामना संपल्यानंतर नोवाक जोकोविचच्या डोळ्यात आश्रू आले. पण त्याने डेनिल मेदवेदेवचे टाळ्या वाजवत अभिनंदन केले. तसेच तो तिसऱ्या सेटमधील 9व्या गेमदरम्यान देखील रडताना दिसला. त्याने टॉवेलने आपले तोंड झाकून ठेवले होते. यावेळी तो हुंदके देताना पाहावयास मिळाला. यानंतर त्याने 10वा गेम खेळला पण सामन्यात तोपर्यंत औपचारिकता शिल्लक राहिली होती. जोकोविचच्या डोळ्यात आश्रू पाहून त्याच्या चाहते भावूक झाले.

जर नोवाक जोकोविचने ही स्पर्धा जिंकली असती तर तो सर्वात जास्त ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरूष खेळाडू ठरला असता. त्याने आतापर्यंत 20 ग्रँडस्लॅम विजयासह स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधलेली आहे.

हेही वाचा -ICC ODI Rankings : मिताली राज अव्वलस्थानी कायम, पण 'या' खेळाडूने वाढवली चिंता

हेही वाचा -IND W vs AUS W: यजमान ऑस्ट्रेलियाला स्मृती मंधानाचा गर्भित इशारा, म्हणाली...

Last Updated :Sep 14, 2021, 5:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details