महाराष्ट्र

maharashtra

World Athletics Championships : लांब उडीच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीशंकर, ठरला पहिला भारतीय पुरुष खेळाडू

By

Published : Jul 16, 2022, 3:14 PM IST

श्रीशंकरने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ( World Athletics Championships ) लांब उडी स्पर्धेत आठ मीटरची उडी मारून अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. त्याचवेळी अविनाश साबळेने 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये 8 मिनिटे 18.75 सेकंद वेळ नोंदवत अंतिम फेरी गाठली आहे.

Murali Sreesankar
मुरली श्रीशंकर

यूजीन (अमेरिका) : अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे. मुरली श्रीशंकर लांब उडीच्या अंतिम फेरीसाठी ( Murali Sreesankar long jump finals reached ) पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचवेळी 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे ( Runner Avinash Sable ) याने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रीशंकरने आठ मीटरची सर्वोत्तम उडी मारून ब गटातील पात्रता फेरीत दुसरे आणि एकूण सातवे स्थान पटकावले.

अंजू बॉबी जॉर्ज ही जागतिक चॅम्पियनशिप लांब उडी स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय होती. तसेच पॅरिसमधील 2003 च्या आवृत्तीत कांस्यपदक जिंकून पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ( Anju Bobby George first athlete win medal ) देखील आहे. इतर दोन भारतीय जेस्विन आल्ड्रिन (7.79 मी) आणि मोहम्मद अनीस याहिया (7.73 मी) अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत, ते गट अ पात्रतेमध्ये अनुक्रमे नवव्या आणि 11व्या स्थानावर राहिले.

साबळे 2019 च्या टप्प्यात 3000 मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. त्याने हीट 3 मध्ये 8:18.75 सेकंदांच्या वेळेसह तिसरे स्थान मिळविले आणि सोमवारी होणार्‍या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी, आशियाई रेकॉर्ड-होल्डिंग शॉट थ्रोअर तेजिंदरपाल सिंग तूर ( Shot thrower Tejinderpal Singh Toor ) याने 'ग्रोइन' दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. पुरुष आणि महिलांच्या 20 किमी चालण्याच्या स्पर्धेतही निराशा आली. ज्यामध्ये संदीप कुमार आणि प्रियंका गोस्वामी यांनी त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा खूपच वाईट कामगिरी केली.

हेही वाचा -Issf Shooting World Cup : ऐश्वर्य प्रतापने नेमबाजीत पटकावले सुवर्णपदक

ABOUT THE AUTHOR

...view details