महाराष्ट्र

maharashtra

Tokyo Paralympics: भाग्यश्री जाधवला सातव्या स्थानावर समाधान

By

Published : Aug 31, 2021, 4:31 PM IST

Updated : Aug 31, 2021, 4:36 PM IST

Tokyo Paralympics: Bhagyashri Jadhav finishes 7th in women's shot put F34 final
Tokyo Paralympics: भाग्यश्री जाधवला सातव्या स्थानावर समाधान ()

भारतीय महिला गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये 7व्या स्थानावर राहिली.

टोकियो - भारतीय महिला गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये 7व्या स्थानावर राहिली. एफ34 च्या अंतिम इव्हेंटमध्ये तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

भाग्यश्री जाधवने 5.87 मीटरचा थ्रो करत चांगली सुरूवात केली होती. परंतु तिला सहा प्रयत्नात 7 मीटर लांब गोळा फेकता आला. या गटात चीनच्या जू लिजूआन हिने 9.19 मीटर लांब गोळा फेकत विश्व विक्रम नोंदवला. तर पोलंडची लुसीना कोर्नोबिस आणि सैदा अमौदी या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिल्या.

दरम्यान, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने सोमवारी एकूण 5 पदके जिंकली. यासह भारताचे या स्पर्धेतील पदक संख्या 8 इतकी झाली आहे. भारतासाठी हे पॅराऑलिम्पिक सर्वात यशस्वी ठरले आहे. याआधी भारताने 2016 रिओ पॅराऑलिम्पिक आणि 1984 पॅराऑलिम्पिकमध्ये प्रत्येकी 4-4 पदके जिंकली होती.

महिला डबल्समध्ये भाविनाबेन आणि सोनलबेन जोडीचा पराभव

टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस क्लास 4 आणि 5 गटात भारताचे खराब प्रदर्शन राहिले. भाविनाबेन पटेल आणि सोनलबेन पटेल या भारतीय जोडीचा चीनच्या झोउ यिंग आणि झांग बियान जोडीने सरळ सेटमध्ये पराभव केला. चीनच्या जोडीने भारतीय जोडीचा 11-2, 11-4, 11-2 असा पराभव केला.

हेही वाचा -Tokyo Paralympics : मानलं रे पठ्ठ्या! विश्वविक्रमासह सुमित अंतिलने जिंकले सुवर्ण पदक

हेही वाचा -Tokyo Paralympics: भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा सुमित अंतिल काय म्हणाला?

Last Updated :Aug 31, 2021, 4:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details