महाराष्ट्र

maharashtra

Tokyo Olympics : नीरज चोप्रा संपवणार भारताचा 121 वर्षांचा पदकाचा दुष्काळ?

By

Published : Aug 7, 2021, 9:51 AM IST

भारताला अॅथलेटिक्स इव्हेंटमध्ये पदक जिंकता आलेले नाही. ब्रिटिश इंडियाकडून खेळताना नॉर्मन प्रिटचार्ड यांनी 1900 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदकं जिंकली होती. परंतु ते भारतीय नाहीत. भारताचा 121 वर्षांचा हा पदकाचा दुष्काळ आज भालाफेकपटू नीरज चोप्रा संपवू शकतो.

Tokyo Olympics: Neeraj Chopra aims to end India's track and field agony
नीरज चोप्रा संपवणार भारताचा 121 वर्षांचा पदकाचा दुष्काळ?

टोकियो - ट्रॅक अॅण्ड फिल्ड इव्हेंट म्हणजे अॅथलेटिक्स ऑलिम्पिकमधील प्रमुख आकर्षण असतात. पण आतापर्यंत भारताला या इव्हेंटमध्ये पदक जिंकता आलेले नाही. ब्रिटिश इंडियाकडून खेळताना नॉर्मन प्रिटचार्ड यांनी 1900 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदकं जिंकली होती. परंतु ते भारतीय नाहीत. भारताचा 121 वर्षांचा हा पदकाचा दुष्काळ आज भालाफेकपटू नीरज चोप्रा संपवू शकतो.

पात्रता फेरीत नीरजने फेकला 86 मीटर लांब भाला

नीरज सद्या तुफान फार्मात आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील पात्रता फेरीत 86.65 मीटर लांब भाला फेकला. तो पात्रता फेरीत ग्रुप ए आणि ग्रुप बी मिळून पहिल्या स्थानावर होता. नीरजचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन 88.06 इतके आहे. त्याने हा थ्रो आशियाई क्रीडा स्पर्धेत केला होता. त्यावेळी तो सुवर्ण विजेता ठरला. अशीच कामगिरी त्याने आज केली तर तो पदक जिंकू शकतो.

जर्मन प्रशिक्षकाकडून घेतली ट्रेनिंग -

नीरज चोप्रा हा भालाफेकचा सराव जर्मन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात करत आहेत. जर्मनचे क्लाउस बार्तोनित्स हे त्याचे प्रशिक्षक आहेत. क्लाउस यांच्या मार्गदर्शनात नीरज चोप्राच्या कामगिरीत दिवसागणित सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

5 सुवर्ण पदकाचा मानकरी नीरज चोपरा

इंडियन आर्मीत काम करणारा नीरज चोप्रा याने आतापर्यंत 5 मोठ्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्याने आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल, आशियाई चॅम्पियनशीप, साउथ आशियाई क्रीडा स्पर्धा, वर्ल्ड ज्यूनियर चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे.

वजन कमी करण्यासाठी आला आणि भालाफेकपटू बनला

नीरज चोप्रा हरियाणाचा पानीपत जिल्ह्याचा रहिवाशी आहे. त्याला आपलं वजन कमी करायचे होते. यामुळे तो अॅथलिटिक्समध्ये आला. त्यानंतर त्याने ग्रुप एज स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. यात त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. यानंतर नीरजने भालाफेकमध्ये करियर केलं. 2016 मध्ये त्याने इंडियन आर्मी जॉईन केली.

हेही वाचा -Tokyo Olympics : भारत आणि पाकिस्तान सुवर्ण पदकासाठी आमने-सामने, आज होणार महामुकाबला

हेही वाचा -टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक हुकल्यानंतर भारतीय महिला खेळाडू निराश, पाहा सामना संपल्यानंतरचे फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details