महाराष्ट्र

maharashtra

Paralympics Medal Tally: जाणून घ्या भारताने पॅराऑलिम्पिकमध्ये किती पदके जिंकली

By

Published : Aug 21, 2021, 10:30 PM IST

पॅराऑलिम्पिकची सुरूवात 1960 साली झाली. यंदाचे हे 11 वे पॅराऑलिम्पिक आहे. यात आतापर्यंत भारतीय पॅराअॅथलिटनी 4 सुवर्ण, चार रौप्य आणि चार कास्य पदक असे एकूण 12 पदके जिंकली आहेत.

Tokyo Paralympics Medal Tally
Paralympics Medal Tally: जाणून घ्या भारताने पॅराऑलिम्पिकमध्ये किती पदके जिंकली

मुंबई -नुकतेच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रदर्शन शानदार राहिले. आता टोकियो पॅराऑलिम्पिकला सुरूवात होणार आहे. यात दिव्यांग खेळाडू सहभागी होतात. भारताने या पॅराऑलिम्पिकसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ पाठवला आहे. ही स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान रंगणार आहे.

टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये 22 क्रीडा प्रकारात 539 स्पर्धत पाहायला मिळतील. 1984 नंतर आतापर्यंत भारत, प्रत्येक पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे. यंदा भारताचे 54 खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतीय खेळाडू पॅरा-अॅथलीट, तिरंदाजी, पॅरा कॅनोइग, अॅथलेटिक्स, नेमबाजी, टेबल टेनिस, स्विमिंग, बॅडमिंटन, पावर लिफ्टिंग आणि तायक्वांदो या खेळात भाग घेणार आहेत. मागील पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेला भारताचा हाय जम्पर मरियप्पन थंगावेलू टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक असणार आहे.

पॅराऑलिम्पिकची सुरूवात 1960 साली झाली. यंदाचे हे 11 वे पॅराऑलिम्पिक आहे. यात आतापर्यंत भारतीय पॅराअॅथलिटनी 4 सुवर्ण, चार रौप्य आणि चार कास्य पदक असे एकूण 12 पदके जिंकली आहेत.

पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारे खेळाडू

  • मुरलीकांत पेटकर यांनी पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकलं. 1972 हीडलबर्ग स्पर्धेत पुरूष 50 मीटर स्विमिंगमध्ये विश्व विक्रम नोंदवत त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यांनी हे अंतर 37.33 सेंकदात पूर्ण केले होते.
  • भीमराव केसरकर यांनी 1984 पॅराऑलिम्पिकमध्ये पुरूष भालाफेक एल-6 मध्ये रौप्य पदक जिंकलं.
  • 1984 मध्ये जोगिंदर सिंह बेदी यांनी पुरूष भालाफेक एल-6 मध्ये कास्य पदकाची कमाई केली होती. यासोबत त्यांनी पुरूष डिस्कस थ्रो एल-6 मध्ये देखील कास्य पदक जिंकलं होतं.
  • देवेंद्र झाझरिया याने एथेंन्स पॅराऑलिम्पिक 2004 मध्ये पुरूष भालाफेक एफ44/46 सुवर्ण पदक जिंकले होते. यानंतर झाझरियाला 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे पदक
  • 2004 एथेन्स पॅराऑलिम्पिकमध्ये राजिंदर सिंह राहेलू यांनी पुरूष पावर लिफ्टिंगमध्ये 56 किलो वजनी गटात कास्य पदक जिंकलं.
  • गिरीश एन गौडा याने लंडन 2012 पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. त्याने पुरुष उंच उडी एफ-42 मध्ये ही किमया साधली.
  • तमिळनाडूचा मरियप्पा थंगावेलू याने 2016 रियो पॅराऑलिम्पिकमध्ये पुरूष उंच उडी एफ-42 मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.
  • 2016 मध्ये दोन भारतीय खेळाडूंनी पदक जिंकले. मैयप्पा आणि वरुण सिंह भाटी या दोघांनी उंच उडीत कास्य पदक जिंकलं.
  • 2004 मध्ये देवेंद्र झाझरिया याने रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये पुन्हा सुवर्ण पदक जिंकले.
  • दीपा मलिकने 2016 रियो पॅराऑलिम्पिकमध्ये शॉट पुट एफ-53 मध्ये 4.61 मीटरचा थ्रो करत रौप्य पदक जिंकलं होतं. दीपा मलिक पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिला महिला खेळाडू आहे.

हेही वाचा -Tokyo Paralympics : टोकियोत तिरंगा फडकवण्यासाठी पॅरा अॅथलिट सज्ज, पाहा भारताचे संपूर्ण शेड्यूल

हेही वाचा -पी. व्ही. सिंधूने सपना चौधरीच्या गाण्यासह बॉलीवूड साँगवर धरला ठेका, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details