महाराष्ट्र

maharashtra

कुस्तीपटू साक्षी मलिकची क्रीडा मंत्रालयावर टीका

By

Published : Aug 23, 2020, 1:28 PM IST

यंदाच्या अर्जुन पुरस्काराच्या यादीतून साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना वगळण्यात आले आहे. साक्षीला २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवण्यासाठी व मीराबाई चानूला २०१८च्या जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्यासाठी यापूर्वीच खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या अर्जुन पुरस्काराच्या यादीतून नाव वगळल्याच्या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'ने साक्षी मलिकची फोनवर मुलाखत घेतली आहे.

Sakhi Malik
साक्षी मलिक

नवी दिल्ली -ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने अर्जुन पुरस्काराच्या यादीतून आपले नाव हटवल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाला फटकारले आहे. नाराज झालेल्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री किरण रिजूजू यांना ट्विट केले आहे. यंदाच्या अर्जुन पुरस्काराच्या यादीतून साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना वगळण्यात आले आहे. साक्षीला २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवण्यासाठी व मीराबाई चानूला २०१८च्या जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्यासाठी यापूर्वीच खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यंदाच्या अर्जुन पुरस्काराच्या यादीतून नाव वगळल्याच्या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'ने साक्षी मलिकची फोनवर मुलाखत घेतली आहे.

साक्षी मलिक मुलाखत

साक्षीने क्रीडा मंत्रालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, त्याने सर्व पुरस्कार आपल्या नावे करावेत. जर मला खेलरत्न मिळू शकतो तर मग अर्जुन पुरस्कार का नाही मिळू शकत? अर्जुन पुरस्कार क्रीडा विश्वातील मानाचा पुरस्कार आहे. माझीही इच्छा आहे की, माझ्या नावासमोर 'अर्जुन पुरस्कार विजेती' असे लागावे. ज्यांना अगोदर उच्च पुरस्कार(खेलरत्न) मिळाला आहे. त्यांना अर्जुन पुरस्कार देता येत नाही, असा तर नियम नाही. असे असेल तर मग ज्यांना दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत, त्यांच्याकडून अर्जुन पुरस्कार परत घेतला पाहिजे, असे परखड मत साक्षीने व्यक्त केले.

भारताची स्टार कुस्तीपटू असलेल्या साक्षी मलिकने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. या व्यतिरिक्त 2014च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने रजत पदक, 2018च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक मिळवले आहे. वेटलिफ्टर मिराबाई चानूने 2014च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये रजत पदक आणि गोल्ड कोस्ट येथे सुवर्ण पदक मिळवलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details