महाराष्ट्र

maharashtra

Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्रानं झुरिच डायमंड लीग स्पर्धेत पटकावलं दुसरं स्थान, फायनलसाठी पात्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 9:33 AM IST

Updated : Sep 1, 2023, 12:22 PM IST

Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्रानं झुरिच डायमंड लीग स्पर्धेत ८५.७१ मीटर थ्रोसह दुसरं स्थान पटकावलं. यासह नीरजनं सप्टेंबरमध्ये होणार्‍या डायमंड लीग फायनलसाठी पात्रता मिळवली. तर भारताच्या मुरली श्रीशंकरनं पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत ७.९९ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह पाचवा क्रमांक पटकावला.

Neeraj Chopra
नीरज चोप्रा

झुरिच (स्वित्झर्लंड) : Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं शुक्रवारी पहाटे झुरिच येथं डायमंड लीग स्पर्धेत ८५.७१ मीटर थ्रोसह दुसरं स्थान पटकावलं. चेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेजच यानं ८५.८६ मीटर थ्रो करून पहिलं स्थान, तर जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं ८५.०४ मीटर थ्रोसह तिसरं स्थान पटकावलं.

नीरजची संथ सुरुवात : नीरजनं पहिल्या प्रयत्नात ८०.७९ मीटर थ्रो करून सुरुवात केली. या राउंडमध्ये लिथुआनियाच्या एडिस मातुसेविशियसनं ८१.६२ मीटर थ्रो करून आघाडी घेतली. दुसऱ्या प्रयत्नात, चेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेजचनं ८३.४६ मीटरचा भक्कम थ्रो करत आघाडी मिळवली. नीरजचा दुसरा प्रयत्न फाऊल ठरला. ज्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेला. त्यानंतर, जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं ८४.७५ मीटर थ्रो केला. परिणामी, नीरज पाचव्या क्रमांकावर घसरला. वेबरनं आघाडीसह दुसरी फेरी संपवली, तेव्हा नीरज पाचव्या क्रमांकावर होता.

चौथ्या प्रयत्नात सर्वोत्तम थ्रो केला : नीरजचा तिसरा प्रयत्नही फाऊल ठरला आणि तो पाचव्या क्रमांकावर कायम राहिला. तिसऱ्या फेरीत वेबरनं आपली आघाडी अबाधित ठेवली. चौथ्या प्रयत्नात झेकच्या जेकुबनं ८५.८६ मीटर थ्रो करत सर्वांना पछाडलं. नीरज अजूनही पाचव्या स्थानावर होता. नीरजचा चौथा थ्रो ८५.२ मीटरचा होता, ज्यामुळे त्यानं थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. जाकुबनं आघाडीसह चौथी फेरी पूर्ण केली आणि नीरज दुसऱ्या स्थानावर राहिला. नीरजचा पाचवा थ्रो पुन्हा फाऊल झाला. तथापि, त्यानं दुसऱ्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी पुरेशी कामगिरी केली होती. या फेरीत जाकुबनही फाऊल केला. मात्र त्याची आघाडी कायम राहिली. अशाप्रकारे नीरजला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

मुरली श्रीशंकरनं लांब उडीत पाचवा क्रमांक पटकावला : दुसरीकडे, भारताच्या मुरली श्रीशंकरनं पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत ७.९९ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह पाचवा क्रमांक पटकावला. श्रीशंकर स्पर्धेच्या अर्ध्याहून अधिक काळ टॉप ३ मध्ये राहिला. मात्र उत्तरार्धात इतरांच्या कामगिरीशी बरोबरी करता न आल्यानं तो क्रमवारीत खाली गेला. ग्रीसच्या मिल्टिडियास टेंटोग्लूनं ८.२० मीटर उडी मारून पहिला क्रमांक पटकावला. तर तमाय गेलनं ८.०७ मीटर उडी मारून दुसरं स्थान मिळवलं. अमेरिकेच्या लॉसन जॅरियननं ८.०५ मीटर उडी मारून तिसरा क्रमांक पटकावला.

हेही वाचा :

  1. Kashinath Naik On Neeraj Chopra : नीरज चोप्राला खरंच प्रशिक्षण दिल होतं का? माजी प्रशिक्षकानं दिल सणसणीत उत्तर
  2. Neeraj Chopra Record : 'गोल्डन बॉय' च्या गावात एकच जल्लोष! 'देशासाठी अभिमानाचा क्षण', नीरज चोप्राच्या वडिलांची प्रतिक्रिया
  3. Neeraj Chopra News : नीरज चोप्राची ऐतिहासक कामगिरी, जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुर्वणपदक मिळविणारा ठरला पहिला भारतीय
Last Updated :Sep 1, 2023, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details