महाराष्ट्र

maharashtra

ISSF Presidents Cup 2022 : नेमबाज रुद्रांक्ष पाटीलची सुवर्ण कामगिरी; भारताला मिळाला 2024 पॅरिस ऑलिम्पिकचा पहिला कोटा

By

Published : Dec 3, 2022, 7:07 PM IST

रुद्रांक्ष पाटीलने इटलीच्या डॅनिलो सोलाझोचा पराभव ( Maharashtra Shooter Rudrankksh Patil Clinches ISSF ) करून ( ISSF Presidents Cup ) आयएसएसएफ ( ISSF ) प्रेसिडेंट चषक जिंकला आहे. रुद्राक्ष पाटील हा महाराष्ट्रातील पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सुपुत्र ( Rudraksh Patil is Son of SP Balasaheb Patil of Palghar ) आहे. आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये रुद्रांक्षने सुवर्णपदक पटकावून ( With Rudranksh Win India Gets First Quota For 2024 Paris Olympics ) देशाला 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पहिला कोटा मिळवून दिला आहे.

Maharashtra Shooter Rudrankksh Patil Clinches ISSF
नेमबाज रुद्रांक्ष पाटीलची सुवर्ण कामगिरी

कैरो : भारतीय नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने कैरो, इजिप्त येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट्स फेडरेशन (ISSF) प्रेसिडेंट्स चषक जिंकून 2022 च्या हंगामाचा दणक्यात ( Rudranksh Patil has Won ISSF President Cup 2022 ) शेवट केला. त्याने 10 मीटर रायफल प्ले ऑफमध्ये इटलीच्या डॅनिलो सोलाझोचा 16-8 असा पराभव केला. SAI मीडियाने सांगितले की, 'रुद्रांक्ष पाटील हा टॉप स्कीम अॅथलीट आहे. ज्याने 10 मीटर रायफल प्ले-ऑफमध्ये सोलाजोचा 16-8 ने पराभव ( India Gets First Quota For 2024 Paris Olympics ) करून ISSF प्रेसिडेंट चषक ( Maharashtra Shooter Rudrankksh Patil Clinches ISSF ) जिंकला. ते म्हणाले की, संपूर्ण भारताला रुद्रांक्षचा अभिमान आहे.

नेमबाज रुद्रांक्ष पाटीलची सुवर्ण कामगिरी

महाराष्ट्राचा सुपुत्र असलेला रुद्राक्षची फायनलमध्ये चमकदार कामगिरी : सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली सोनेरी यशाची कामगिरी करीत तो स्वतःची क्षमता सिद्ध करीत आहे. दर्जेदार नेमबाज म्हणून आज त्याने आपला ठसा उमटवला, अशा शब्दात संघटनेच्या जनरल सेक्रेटरी शीला यांनी रुद्रांक्ष खास कौतुक केले. तर रुद्रांक्ष पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सुपुत्र आहे. लहानपणापासूनच रुद्रांक्षच्या आई-वडिलांनी अथक परिश्रम घेऊन हे शिखर गाठण्यासाठी त्याला मदत केली आहे.

मुख्य प्रशिक्षकांसह सर्व स्तरातून रुद्रांक्षचे कौतुक : महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने फायनलमध्ये जोरदार कामगिरी केली. आपल्या दर्जेदार कामगिरीत त्याने सातत्य ठेवत सुवर्णपदक जिंकले. त्याने याच सुवर्णपदकातून सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. यातून महाराष्ट्राच्या नावे पहिल्या सुवर्णपदकाची नोंद झाली. त्याचीही कामगिरी निश्चितपणे युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी रुद्रांक्षवर कौतुकाचा वर्षाव केला.

ISSF रायफल/पिस्तूल वर्ल्ड चॅम्पियनशिप पुरुषांच्या 10 मीटर एअरमध्ये सुवर्णपदक :सर्व खंडातील 43 ISSF सदस्य फेडरेशनचे प्रतिनिधित्व करणारे 42 देशांतील खेळाडू स्पर्धा करण्यास पात्र आहेत. ते सर्व 2022 च्या जागतिक क्रमवारीनुसार वैयक्तिक ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अव्वल 12 मध्ये आहेत. 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही स्पर्धा आज संपली आहे. रुद्रांक्ष पाटील, 18, याने यापूर्वी ऑक्टोबरमध्ये कैरो येथे झालेल्या ISSF रायफल/पिस्तूल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

भारताला मिळाला 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पहिला कोटा :त्याच्या विजयामुळे भारताला 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पहिला कोटा मिळाला. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा, तेजस्विनी सावंत, मानवजीत सिंग संधू, ओम प्रकाश मिथरवाल आणि अंकुर मित्तल यांच्यानंतर रुद्रांक्ष हा सहावा भारतीय आहे. रुद्राक्ष लहान वयात मोठे पराक्रम करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details