महाराष्ट्र

maharashtra

तिसरा टी20 सामना: भारतानं दक्षिण आफ्रिकेला चिरडलं; 106 धावांनी केला पराभव, सुर्याचं धडाकेबाज शतक

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 8:05 AM IST

India vs South Africa 3rd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी धुव्वा उडवला. भारताकडून खेळताना सुर्यकुमार यादवनं टी20 सामन्यात शतक झळकावलं.

India vs South Africa 3rd T20
संग्रहित छायाचित्र

जोहान्सबर्ग India vs South Africa 3rd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात सुर्यकुमार यादवनं 56 चेंडूत 100 धावा काढत धडाकेबाज शतक झळकावलं. भारतानं दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून तीन सामन्याची ही मालिका बरोबरीत सोडवली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसरा सामना पावसाच्या मदतीनं दक्षिण आफ्रिका संघानं जिंकला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर जोरदार प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेच्या संघावर विजय मिळवला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजीचा निर्णय :भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान गुरुवारी खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारतानं जोरदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 202 धावांचं लक्ष्य दिलं.

सुर्यकुमार यादवचं धडाकेबाज शतक :भारतीय संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादवनं तिसऱ्या टी20 सामन्यात धडाकेबाज शतक ठोकून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. सुर्यकुमार यादवनं 56 चेंडूत 100 धावा ठोकल्या. सुर्यकुमार यादवनं 56 चेंडूत सात चौकार आणि आठ षटकार ठोकले. त्याला यशस्वी जैस्वालनं चांगली साथ दिली. यशस्वी जैस्वालनं 41 चेंडूत 60 धावा केल्या. रिंकू सिंग 14 तर शुभमन गिल 12 धावा करुन बाद झाला.

दक्षिण आफ्रिकेचा संघ 95 धावात गुंडाळला :भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही वर्चस्व गाजवलं. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा संघ 95 धावांमध्येच गुंडाळला. त्यामुळे भारताला मोठा विजय मिळवण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेचा संघ 13.5 षटकात गारद झाला असून त्यांच्या एकाही फलंदाजाला धावसंख्येचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतीय गोलंदाज कुलदीप यादवनं दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं, तर रवींद्र जाडेजानं दोन बळी टिपले. मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

हेही वाचा :

  1. पावसानं केला घोळ, भारत-दक्षिण आफ्रिका सामना टॉस न होताच रद्द
  2. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; तीन फॉरमॅटसाठी तीन कर्णधार, रोहित, विराटला विश्रांती

ABOUT THE AUTHOR

...view details