महाराष्ट्र

maharashtra

टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव

By

Published : Aug 19, 2021, 6:47 PM IST

टोकियो पॅराऑलिम्पिकला सुरूवात होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशात पॅराऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.

first-case-of-corona-reported-in-tokyo-paralympic-village
टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव

टोकियो - टोकियो पॅराऑलिम्पिकला सुरूवात होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशात पॅराऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. पॅराऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. यामुळे चिंता वाढली आहे.

अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या माणसाला कोरोनाची लागण झाली आहे. तो गेम्स रिलेटेड सदस्य आहे. पण तो जपानचा नागरिक नसल्याची माहिती आयोजकांनी दिली.

आतापर्यंत पॅराऑलिम्पिकमध्ये 74 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याचे आयोजकांनी सांगितलं. यातील बहुतांश हे ठेकेदार आणि गेम्सचा स्टाफ आहे. जे जपानमध्ये राहतात. परंतु अद्याप एकाही अॅथलिटला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेले नाही.

दरम्यान, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये 160 संघ 4 हजार 400 अॅथलिट सहभागी होणार आहेत. याचे आयोजन 5 सप्टेंबरपासून होणार आहे. सर्व अॅथलिटची दररोज कोरोना चाचणी करण्यात येत आहे. याशिवाय सर्वांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक करण्यात आले आहे.

भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा टोकियोत दाखल

भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक आणि उपप्रमुख डी मिश अरहान बगाती हे टोकियोत दाखल झाले आहेत. दीपा मलिक यांनी ट्विट करत याची माहिती दिली.

दीपा मलिक त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, आरामात चेक इन केलं. कोरोना प्रोटोकॉलनुसार सर्व झालं. विमानतळावर अनेक बुथ आणि स्वयंसेवकांनी आम्हाला मदत केली.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे 54 पॅरा अॅथलिट सहभागी होणार आहेत. यंदा भारत आपला सर्वात मोठा पॅराऑलिम्पिक संघ पाठवणार आहे.

हेही वाचा -'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची सत्काराच्या वेळी तब्येत बिघडली

हेही वाचा -यूपी सरकारचा टोकियो ऑलिम्पिक पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

ABOUT THE AUTHOR

...view details