महाराष्ट्र

maharashtra

Exclusive: पॅरा अॅथलिट पहिल्यापासूनच रिअल हिरो आहेत, सुवर्णपदक विजेत्या अवनीच्या वडिलांची प्रतिक्रिया

By

Published : Aug 30, 2021, 3:27 PM IST

जेव्हा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकतो तेव्हा तो हिरो ठरतो. पण पॅराऑलिम्पिकमधील खेळाडू पहिल्यापासूनच एक रिअल हिरो आहेत, अशी प्रतिक्रिया टोकियो पॅराऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेती खेळाडू अवनी लेखराचे वडिल प्रविण लेखरा यांनी दिली.

Exclusive: Paralympic athletes are real life heroes: Father on Avani Lekhara historic gold medal win
Exclusive: Paralympic athletes are real life heroes: Father on Avani Lekhara historic gold medal win

श्रीगंगानगर (राजस्थान) - टोकियोत सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची अवनी लेखरा हिने सुवर्ण पदक जिंकले. अवनी लेखराने महिला 10 मीटर एअर रायफलच्या (एसएच1) अंतिम सामन्यात सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. ती एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली. विजयानंतर अवनी लेखराचे वडिल प्रविण लेखरा यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली.

ईटीव्ही भारतशी बोलताना प्रविण लेखरा म्हणाले की, अवनी एअर रायफल नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केलं. फेब्रुवारी 2012 मध्ये आग्रा येथे झालेल्या अपघातानंतर अवनीचे आयुष्य बदलले.

अवनी लेखराच्या वडिलांशी बोलताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

अपघातानंतर अवनीला ठीक करण्यासाठी अनेक ठिकाणच्या डॉक्टरांकडे उपचार घेतले. अपघातावेळी अवनी कारच्या मागील सीटवर झोपली होती आणि अचानक अपघात झाला. या अपघातात अवनीच्या कमरेखालच्या भागाने काम करणे बंद केले, असल्याचे देखील प्रविण लेखरा यांनी सांगितलं.

अवनी लेखरावर जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात जवळपास 3 महिने उपचार सुरू होते. पण यात ती पूर्ण पणे ठीक होऊ शकली नाही. दोन वर्षांनंतर अवनी खेळाकडे वळाली.

प्रविण लेखरा यांनी राजस्थान सरकार आणि भारत सरकारचे आभार मानले. ते म्हणाले की, सरकारने अवनीला सर्व प्रकारे मदत केली. तिला नेहमी गाईड केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलल्यानंतर खेळाडूंवर सकारात्मक प्रभाव पडला.

अवनी लेखरा दररोज 7 ते 8 तास सराव करत होती. त्याचे आज तिला फळमिळाले. आपल्या पाल्याला पुढे जात असल्याचे पाहून आई वडिलांची छाती अभिमानाने भरुन येते, असे देखील प्रविण लेखरा यांनी सांगितलं.

जेव्हा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकतो तेव्हा तो हिरो ठरतो. पण पॅराऑलिम्पिकमधील खेळाडू पहिल्यापासूनच एक रिअल हिरो आहेत, असे देखील प्रविण लेखरा म्हणाले.

हेही वाचा -Tokyo Paralympics : भारताची पॅरालिम्पिकमध्ये 7 पदकांची कमाई; अवनी लेखराचा सुवर्णवेध...

हेही वाचा -Tokyo Paralympics: भाविनाबेन पटेलच्या 'रुपेरी' कामगिरीचे अभिनव बिद्राने केलं कौतुक, म्हणाला...

ABOUT THE AUTHOR

...view details