महाराष्ट्र

maharashtra

ISSF World Championship 2022 : भारतीय नेमबाजांची सुवर्ण कामगिरी; 4 सुवर्णपदकांसह भारत पदतालिकेत द्वितीय स्थानावर

By

Published : Oct 19, 2022, 2:03 PM IST

ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय नेमबाजांनी ( CAIRO ISSF World Championship 2022 )आपली चमकदार कामगिरी सुरू ( Indian Shooters Won More Four Gold Medals ) ठेवली आहे. ( ISSF World Championship 2022 in Egypt ) नेमबाजांनी आणखी चार सुवर्णपदके जिंकली आहेत. पदकतालिकेत भारत एकूण 20 पदकांसह दुसऱ्या स्थानावर पोहचला ( India's Total Medal Tally has Gone Up to 20 ) आहे.

ISSF World Championship 2022
भारतीय नेमबाजांची सुवर्ण कामगिरी

कैरो : इजिप्तमध्ये सुरू असलेल्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 मध्ये ( CAIRO ISSF World Championship 2022 ) भारतीय कनिष्ठ नेमबाजांनी ( Indian Shooters Won More Four Gold Medals ) मंगळवारी आणखी चार सुवर्णपदके जिंकली. चार पदकांसह ( ISSF World Championship 2022 in Egypt ) भारताच्या एकूण पदकांची संख्या 20 झाली ( India's Total Medal Tally has Gone Up to 20 )आहे. ज्यामध्ये नऊ सुवर्ण, तीन रौप्य आणि आठ कांस्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत दुसऱ्या, तर चीन पहिल्या स्थानावर आहे. चीनने चॅम्पियनशिपमध्ये 18 सुवर्णपदकांसह एकूण 37 पदके जिंकली आहेत.

महिलांच्या एअर पिस्तूल संघाने मिळवले पहिले सुवर्णपदक :स्पर्धेच्या सहाव्या दिवशी ईशा सिंग, शिखा नरवाल आणि वर्षा सिंग यांच्या एअर पिस्तूल संघाने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. सुवर्णपदकाच्या लढतीत भारताने चीनचा 16-6 असा पराभव केला. यानंतर रमिता, नॅन्सी आणि तिलोत्तमा सेन या त्रिकुटाने ज्युनियर रायफल सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक ( Tilottama Sen Won India Gold Medal in Junior Rifle Team ) मिळवून दिले. भारतीय संघाने चीनचा १६-२ असा पराभव केला.

पुरुषांच्या एअर रायफल संघाने भारतासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले :पुरुषांच्या एअर रायफल संघाने भारतासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले. ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, श्री कार्तिक साबरी राज रविशंकर आणि विदित जैन या त्रिकुटाने अंतिम फेरीत चीनच्या संघाचा १७-११ असा पराभव केला. पायल खत्री आणि आदर्श सिंग यांच्या ज्युनियर मिश्र संघाने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात भारतासाठी चौथे सुवर्णपदक जिंकले.

ABOUT THE AUTHOR

...view details