महाराष्ट्र

maharashtra

टोकियो पॅराऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात 6 अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी

By

Published : Aug 22, 2021, 7:00 PM IST

मंगळवारी होणाऱ्या टोकियो पॅराऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात, भारतीय दल 11 जणांचा असणार आहे. यात 6 अधिकारी आणि 5 पॅरा अॅथलिट असतील.

5 athletes, 6 officials from Indian contingent to take part in Tokyo Paralympics opening ceremony
टोकियो पॅराऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात 6 अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी

टोकियो -टोकियो पॅराऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडणार आहे. या सोहळ्यात भारताच्या सहा अधिकाऱ्यांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय पॅराऑलिम्पिकचे महासचिव गुरूशरण सिंग यांनी याची माहिती आज दिली.

टोकियो पॅराऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात, भारतीय दल 11 जणांचा असणार आहे. यात 6 अधिकारी आणि 5 पॅरा अॅथलिट असतील. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्व अॅथलिट्स परवानगी आहे. परंतु, भारताचे आतापर्यंत फक्त 7 अॅथलिट टोकियोला पोहोचले आहेत. यातील पाच जण उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

टोकियोत पोहोचलेल्या सात पॅरा अॅथलिटमध्ये टेबल टेनिसपटू सोनल पटेल आणि भाविना पटेल यांचा समावेश आहे. बुधवारी या दोघींचा सामना आहे. यामुळे त्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. जपानचे सम्राट नारुहितो हे या स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत.

भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे महासचिव गुरूशरण सिंग यांनी सांगितलं की, उद्घाटन सोहळ्यात केवळ सहा अधिकाऱ्यांना सामिल होण्याची परवानगी आहे. तर कितीही अॅथलिट यात सहभागी होऊ शकतात. त्यांना याची परवानगी आहे. टेबल टेनिसपटूंचे बुधवारी सामने होणार आहेत. यामुळे ते उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.

टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक मरियप्पन थंगावेलू आहे. त्याच्यासोबत डिस्कस थ्रोवर विनोद कुमार, भालाफेकपटू टेक चंद, पावर लिफ्टर जयदीप यांच्यासह सकिना खातून ही देखील या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहे. तर अधिकाऱ्यांमध्ये सहा पैकी चार नावे निश्चित करण्यात आली आहेत.

गुरूशरण सिंह, अरहान बागती, वी के डबास, मरियप्पनचे प्रशिक्षक सत्यनारायण हे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आणखी दोन नावे लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत. दरम्यान, भारताने टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी 54 अॅथिलटचा संघ पाठवला आहे.

हेही वाचा -Tokyo Paralympics : टोकियोत तिरंगा फडकवण्यासाठी पॅरा अॅथलिट सज्ज, पाहा भारताचे संपूर्ण शेड्यूल

हेही वाचा -Paralympics Medal Tally: जाणून घ्या भारताने पॅराऑलिम्पिकमध्ये किती पदके जिंकली

ABOUT THE AUTHOR

...view details