महाराष्ट्र

maharashtra

खेळात थोड्या बदलाची गरज, आम्ही टॉप संघाना हरवू शकतो - राणी रामपाल

By

Published : Feb 2, 2021, 5:30 PM IST

आम्ही खेळात थोडाफार बदल केला तर नक्की आम्ही मोठ्या संघाना पराभूत करू, असा विश्वास राणी रामपालने व्यक्त केला आहे.

with-little-more-change-we-can-definitely-beat-top-teams-says-hockey-team-captain-rani-rampal
खेळात थोडे बदलाची गरज, आम्ही टॉप संघाना हरवू शकतो - रानी रामपाल

मुंबई -भारत आणि अर्जेटिना यांच्या महिला हॉकी संघात, रविवारी झालेला सामना १-१ अशा बरोबरीत सुटला. भारतीय संघाचा हा अर्जेटिना दौऱ्यातील चौथा सामना होता. उभय संघातील तिसरा सामना पावसमुळे रद्द झाला. तर पहिले दोन्ही सामने अर्जेटिनाच्या वरिष्ठ संघाने जिंकले. चौथ्या सामन्यानंतर राणी रामपालने सांगितले की, आम्ही खेळात थोडाफार बदल केला तर नक्की आम्ही मोठ्या संघाना पराभूत करू.

राणी म्हणाली, '२०१७ मध्ये आम्ही वर्ड कप सेमीफायनलमध्ये अर्जेटिनाविरोधात खेळलो. तेव्हा आमचे खेळाडू चेंडूसह मैदानाचा अर्धा भाग पार करू शकले नाहीत. परंतु आम्हाला सतत खेळात बदल करावा लागणार आहे. यात जर आम्ही यशस्वी ठरलो, तर आम्ही नक्कीच मोठ्या संघाना पराभूत करू शकू. अर्जेटिना दौऱ्यातील अनूभव चांगला होता.'

कोरोना काळात हॉकी इंडिया आणि साईने अर्जेटिनाचा दौरा आयोजित केला. यामुळे मी त्यांचे आभार मानते, असे देखील राणी म्हणाली. बंगळुरूला परतल्यानंतर आम्ही अर्जेटिना दौऱ्याचे मुल्यांकन करू. तसेच आमची कामगिरी कशी उंचावेल, यावर रणणिती आखणार असल्याचे देखील राणीने स्पष्ट केले. दरम्यान, भारतीय महिला हॉकी संघ बुधवारी मायदेशी परतणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details