महाराष्ट्र

maharashtra

महिला हॉकी: भारतीय संघाने दिग्गज ऑस्ट्रेलियाची केली दमछाक, सामना २-२ ने बरोबरीत

By

Published : Aug 18, 2019, 12:55 PM IST

रोमांचक सामन्यात भारताकडून वंदना कटारिया आणि गुरजीत कौर हिने प्रत्येकी एक गोल केले. तर ऑस्ट्रेलियाकडून केटलिन नॉब्स आणि ग्रेस स्टिवर्ट हिने प्रत्येकी एक गोल केले.

महिला हॉकी: भारतीय संघाने दिग्गज ऑस्ट्रेलियाची केली दमछाक, सामना २-२ ने बरोबरीत

टोकियो - ऑलिम्पिकसाठीच्या सराव हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ नेत्रदीपक कामगिरी करत आहे. भारतीय संघाने, दिग्गज ऑस्ट्रेलियाविरुध्दचा झालेला रोमांचक सामना बरोबरीत सोडवला. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना यजमान जपानविरुध्द झाला होता. या सामन्यात भारताने जपानला २-१ ने पराभूत केले होते. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला २-२ ने बरोबरीत रोखले.

रोमांचक सामन्यात भारताकडून वंदना कटारिया आणि गुरजीत कौर हिने प्रत्येकी एक गोल केले. तर ऑस्ट्रेलियाकडून केटलिन नॉब्स आणि ग्रेस स्टिवर्ट हिने प्रत्येकी एक गोल केले.

सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धडाका लावत पहिल्या १४ मिनिटातच गोल केले. यामुळे भारतीय संघ दडपणाखाली गेला. तेव्हा दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने, आपला खेळ उंचावत ३६ व्या मिनिटाला वंदन हिने केलेल्या गोलमुळे बरोबरी साधली.

त्यानंतर काही मिनिटातच ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टिवर्ट हिने सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला अप्रतिम गोल केला. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ २-१ ने सामन्यात पुढे पोहोचला. तेव्हा ५९ व्या मिनिटाला गुरजीत कौरने गोल करत भारताला पराभूत होण्यापासून वाचवले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक क्रमवारीत २ नंबर आहे तर भारतीय संघ १० नंबरवर आहे. मात्र, या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पकड केली होती. भारताचा पुढील सामना मंगळवारी चीनच्या विरुध्द होणार आहे.

Intro:Body:

sports


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details