महाराष्ट्र

maharashtra

Asian Champions Trophy : पाकिस्तानला 3-1 ने हरवून भारत उपांत्य फेरीत

By

Published : Dec 17, 2021, 8:49 PM IST

भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव केला
भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव केला ()

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा ३-१ असा पराभव केला. भारताकडून हरमनप्रीतने 2 आणि आकाशदीप सिंगने 1 गोल केला. या विजयासह भारताचे आता 3 सामन्यांतून 7 गुण झाले आहेत.

हैदराबाद- बांगलादेशची राजधानी ढाका येथे खेळल्या जात असलेल्या पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 मधील तिसऱ्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. हरमनप्रीत सिंग पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन गोल करत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

आकाशदीप सिंगच्या स्टिकमधून एक गोल झाला. या संपूर्ण सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम राखला, काही प्रसंगी पाकिस्तानने भारताचा बचाव भेदण्यात यश मिळवले. मात्र, पाकिस्तानकडून एकच गोल होऊ शकला.

भारताने या स्पर्धेची सुरुवात कोरियाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी करून केली. तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 9-0 असा पराभव झाला. मस्कत येथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 चा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले होते.

बुधवारी बांगलादेशचा 9-0 असा पराभव केल्यानंतर भारताचा उत्साह वाढला होता. पाकिस्तानविरुद्ध खेळाडूंनी जबरदस्त सुरुवात केली. त्भारतासाठी मनप्रीत सिंगने पहिला गोल केला. पेनल्टी कॉर्नरवर त्याने हा गोल केला. यादरम्यान भारताला अनेक संधी मिळाल्या, मात्र त्यांचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. या स्कोअरवर पहिला क्वार्टर संपला. पहिल्या गोलनंतर टीम इंडियाचा जल्लोष पाहण्यासारखा होता.

हाफ टाईमपर्यंत भारताची 1-0 आघाडी

दरम्यान, पाकिस्तानने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र भारताने सामन्यावरील पकड ढिली होऊ दिली नाही. भारताने चेंडू आपल्या ताब्यात ठेवत पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला. पाकिस्तानकडून अफराझने प्रयत्न केले, पण भारतीय बचावफळीच्या सतर्कतेने या युवा खेळाडूला गोल करू दिला नाही. हाफ टाईमपर्यंत स्कोअर 1-0 राहिला.

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारत

तिसऱ्या क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंगने भारतासाठी दुसरा गोल केला. त्याने 42 व्या मिनिटाला चेंडू नेटमध्ये घुसवून भारताची आघाडी दुप्पट केली. मात्र, जुनैद मंजूरने काही वेळातच प्रत्युत्तर देत संघासाठी पहिला गोल केला. अशाप्रकारे तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस स्कोअर 2-1 असा झाला.

54व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रीत सिंगने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. जबरदस्त फटकेबाजी करताना त्याने चेंडू पोस्टमध्ये अडकवला. यासह भारतीय संघाची आघाडी 3-1 अशी झाली. यानंतर पाकिस्तानने पलटवार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण भारताच्या भक्कम बचावाला भेदण्यात अपयश आले.

हेही वाचा - 'झिम्मा'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम, कमाई 10 कोटी पार

ABOUT THE AUTHOR

...view details